संगमेश्वर-कसब्याच्या ऐतिहासिक भूमीत सुरू आहे नित्यपूजेचे व्रत

संगमेश्वर-कसब्याच्या ऐतिहासिक भूमीत सुरू आहे नित्यपूजेचे व्रत
Published on

rat16p40.jpg
45647
संगमेश्वरः कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा.
--------
कसब्याच्या ऐतिहासिक भूमीत सुरू आहे नित्यपूजेचे व्रत
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम; छत्रपती शंभूराजांचा इतिहास सर्वदूर पोचविण्याचा उद्देश
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १६ः श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे छत्रपती शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कसब्याच्या या ऐतिहासिक भूमीत गेले १५ महिने नित्यपूजेचे व्रत सुरू आहे.
कसबा हे केवळ एक गाव नसून या कोकण भूमीला लाभलेला एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे. इथे इतिहास आहे, इथे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन माती आहे, इथे शक्ती आणि भक्तीच सुंदर वलय आहे. या भूमीत मौर्य, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, मोरे, सुर्वे, शिर्के अशा कित्येक क्षत्रिय घराण्याचा इतिहास आहे. मात्र महाराष्ट्रासमोर संगमेश्वरची ओळख धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कट करून, फितुरी करून पडकल ते गाव कसबा-संगमेश्वर अशी झाली आहे. हा काळीमा पुसण्यासाठी एक पिढी पुरणार नाही, हे ज्ञात असतानाही संगमेश्वरला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्म आणि त्यागाच्या मार्गावर चालणारा तालुका, शिवशंभूपाईकांचा तालुका ही ओळख प्राप्त करून देण्यास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमधील सर्व धारकरीबांधवांनी, कसबा ग्रामस्थ आणि संगमेश्वरमधील कित्येक गावातील श्री शिवशंभूपाईकांसमवेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे नित्यपुजनाचे अखंड व्रत गेले सुमारे दीड वर्ष सुरू ठेवले आहे.
महाराजांची दररोज विधीवत पूजा झाली पाहिजे, संगमेश्वरमधील सर्व नागरिकांना शंभूराजांच्या त्यागाच बलिदानचं महत्व समजलं पाहिजे, धर्मनगरी कसबा-संगमेश्वरकडे शिवपाईकांची ओढ वाढली पाहिजे, कसबा-कारभाटले आणि शृंगारपूरचे सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्व प्रखर झळकले पाहिजे, असा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक नित्यपूजा समिती प्रमुख धारकरी सिद्धेश चव्हाण, नित्यपुजन नियोजन समन्वयक श्रेयस शेट्ये, निशांत जाखी, जीवन जाधव, अविनाश पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com