रत्नागिरीःखानू येथील घरातून ७१ हजाराचे दागिने पळविले
खानू येथील घरातून
७१ हजारांचे दागिने पळविले
रत्नागिरी, ता. १६ः तालुक्यातील खानू-मावळंकरवाडी येथे घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा असताना चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचा ७१ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल पळविला. ग्रामीण पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १४) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खानू-मावळंकरवाडी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष महादेव मावळंकर (वय ५०, रा. खानू-मावळंकरवाडी) यांचा मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय आहे. शुक्रवारी त्यांच्या राहत्या घराचा मागील दरवाजा उघडा राहिला. ही संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील लॉकरची चावी काढून कपाटातील ६ हजारांचे मंगळसूत्र, २० हजार ३०० रुपयांचे सोन्याचे पेंडल असलेले मंगळसूत्र, २१ हजार ४४५ रुपयांच्या एकूण सात सोन्याच्या अंगठ्या, २३ हजार ६३५ रुपयांच्या कानातील कुडीसह झुमके असा सुमारे ७१ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळविला. याप्रकरणी संतोष मावळंकर यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

