डबलबारी भजनाचे नवे नियम पाळा

डबलबारी भजनाचे नवे नियम पाळा

Published on

45664

डबलबारी भजनाचे नवे नियम पाळा

कणकवलीतील सूचना; भजनी बुवा, कलाकारांची बैठक

कणकवली, ता. १६ ः सिंधुरत्न संगीत भजनोत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्गतर्फे येथे बोलाविलेल्या भजनी बुवा आणि भजनी कलाकार, तसेच भजनीश्रोत्यांच्या बैठकीत भजनाच्या डबलबारीचे नवे नियम तंतोतंत पाळण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. येथील भालचंद्र महाराज मठाच्या सभागृहात ही बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सिंधुरत्न भजन उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष भजनी बुवा भालचंद्र केळुस्कर उपस्थित होते.
या बैठकीला कणकवली तालुका सांप्रदायिक भजन मंडळाचे अध्यक्ष भजनी बुवा प्रकाश पारकर यांनी बैठकीमागचा उद्देश सांगितला. बुवा शशी राणे, गोपीनाथ लाड, सुदर्शन फोपे, पत्रकार गणेश जेठे, मारुती मेस्त्री, हेमंत तवटे, योगिता परब, मयूर ठाकूर, चंद्रशेखर चव्हाण, श्रीकांत शिरसाट, रवींद्र कदम, राज वर्देकर, ज्ञानदेव मेस्त्री, चंद्रकांत गुरव, नामदेव गिरकर, जनार्दन सावंत, दत्ताराम मेस्त्री, संजय ठाकूर, आनंद मेस्त्री, विकास गुरव, सखाराम येंडे, गणेश मेस्त्री, किशोर सुतार, गौरव लाड, पंढरी जाधव, संजय येंडे, प्रकाश पवार, अथर्व पवार, शंकर राणे आदी उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. हेमंत तवटे यांनी डबलबारी भजनाचे नवे नियम वाचून दाखवले. हे नियम ओरोस येथील रवळनाथ मंदिरात झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत ठरविण्यात आले होते.
दरम्यान, हे सर्व नियम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांना लागू आहेत. हे नियम जो पायदळी तुटवेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जे कलाकार या नियमांचे पालन करतील, त्याच भजनी कलाकारांना भविष्यात कलाकार मानधन देण्याबाबतचा शिफारस दिली जाईल. जे नियम पाळणार नाहीत, अशांना कलाकार मानधन देऊ नये, अशी मागणी शासनाकडे केली जाईल, असा इशाराही या बैठकीत दिला. या सर्व नियमांचे पालन करण्याचा निर्णय कणकवलीतील बैठकीत घेण्यात आला. शिवाय गावोगावीची भजन मंडळे आहेत. त्यातील बुवा, मृदंगवादक, तालरक्षक, कोरस या सर्वांची माहिती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक भजनी कलाकाराकडे अर्ज दिले आहेत. माहिती भरलेल्या अर्जाची एक प्रत संबंधित भजनी कलाकाराकडे, दुसरी प्रत तालुक्याच्या मंडळाकडे आणि तिसरी प्रत जिल्ह्याच्या मंडळाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश पारकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भालचंद्र केळुसकर यांनी मार्गदर्शन केले.
------------
बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय
महिला आणि पुरुष भजनी बुवा यांच्यामध्ये पुढील एक वर्षांसाठी डबलबारी भजनास बंदी. डबलबारी भजनातील बुवांनी एकमेकांना अरे-तुरेची भाषा करू नये. भजन करताना बुवाने, वादकाने मद्य प्राशन करू नये, तसे आढळल्यास कारवाई होणार. पूर्वीच्या डबलबारी प्रमाणे हिंदू धर्म संस्कृती टिकवून भजन करावे. गॉगल लावून हातवारे करून तलवारी काढून विक्षिप्त हावभाव करून भजन करू नये. एका बुवाची बारी चालू असताना दुसऱ्याने मध्ये बोलू नये. युट्यूबरने परवानगी घेऊनच व्हिडिओ करावा, भडकाऊ कॅप्शन देऊ नये. भजनाचा आर्केस्ट्रा होऊ देऊ नये, गजरामध्ये फर्माईश शिवाय इतर गाणी गाऊ नये. वेळेच्या बंधनानुसार सर्व फेऱ्या पूर्ण करणे. रूपावळ पर्यंत सलग भजन करावे, गजर स्वतंत्र असावा. एका गजराला जास्ती जास्त ४० मिनिटे इतकाच वेळ घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com