हातखंब्यातील दुचाकी अपघातात विवाहिता ठार

हातखंब्यातील दुचाकी अपघातात विवाहिता ठार

Published on

हातखंब्यात अपघातात
विवाहिता जागीच ठार
पती जखमी : ट्रक गेला हातावरून
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः तालुक्यातील हातखंबा तिठा येथे दुचाकी-ट्रकमध्ये झालेल्या अपघातामध्ये विवाहिता जागीच ठार झाली. हा अपघात रविवारी (ता. १६) दुपारी पावणेतीनच्या सुमारास हातखंबा तिठा येथील हॉटेलसमोर मुख्य रस्त्यावर झाला. याची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तैसिरा अमीन हिसब (वय २६, रा. मुंबई, सध्या वडवली, ता. लांजा) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमीन हिसब मुंबईला राहतो. अमीन काही दिवसांपूर्वी मुंबईहून वडवली (ता. लांजा) येथे गावाला आला होता. त्याचा तीन वर्षांपूर्वी तैसिरा हिच्याबरोबर विवाह झाला होता. रविवारी दुपारी पत्नी तैसिरा हिच्यासह दुचाकीवरून लांजा येथून रत्नागिरीकडे येत होता. हातखंबा तिठा येथे मुख्य महामार्गावर आला असता त्यांच्या दुचाकीमागून ट्रक जात होता. ट्रक दुचाकीच्या अगदीजवळ आल्यामुळे अमीन याचा दुचाकीवरील ताबा सुटला. रस्त्याचे कॉंक्रिटकरणाचे काम सुरू असल्यामुळे अमीनला दुचाकी सावरता आली नाही. ते दोघेही दुचाकीवरून पडले. अमीन उठेपर्यंत मागून येणारा ट्रक पत्नीच्या हातावरून गेला होता. त्यात ती गंभीर जखमी झाली. अमीन हा देखील गंभीर जखमी झाला. तैसिरा व अमीन यांना तेथील ग्रामस्थांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तैसिरा यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताची ग्रामीण पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिस घटनास्थळी तसेच रुग्णालयात दाखल झाले. पंचनामा केला. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

चौकट
पतीला काहीच
आठवत नाही
अपघातात जखमी झालेल्या अमीन याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर काहीच आठवेनासे झाले आहे. नातेवाईक त्याला धीर देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com