सावंतवाडी कॅथॉलिक अर्बन बॅंकेला ''कोकण पतसंस्था भूषण'' सन्मान
45675
‘सावंतवाडी कॅथॉलिक अर्बन’ला
कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार
सावंतवाडी, ता. १६ ः कॅथॉलिक अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी या पतसंस्थेस ‘कोकण पतसंस्था भूषण’ हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अलिबाग येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.
अलिबाग येथे विभागीयसह निबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघाच्या संयुक्त विद्यमाने कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार सोहळा २०२५ नुकताच झाला. यात २०० ते ५०० कोटी एकत्रित व्यवसाय गटात कॅथॉलिक अर्बनला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते पुरस्कार दिले. पतसंस्थेच्या चेअरमन आनमारी डिसोझा, संचालक अगस्तिन फर्नांडिस, जनरल मॅनेजर जेम्स बोर्जीस, फ्रॅकी डान्टस, फातिमा कार्डोझ आदींना सन्मानचिन्ह, रोख रक्कम व भारतीय संविधान देऊन हा गौरव करण्यात आला. सातत्यपूर्ण प्रगती, सहकारातील योगदान आणि गुणवत्ता सिध्दतेमुळे हा सन्मान कॅथॉलिक अर्बन पतसंस्थेला देण्यात आला. कोकण विभागातून अनेक अर्ज आल्यामुळे ही निवड प्रक्रिया चुरशीची होती; मात्र परंतु यात कॅथॉलिक अर्बनने यश मिळविले. याप्रसंगी राज्य निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे, खासदार धैर्यशील पाटील, मिलिंदसेन भालेराव, निरंजन डावखरे, शैलेशजी कोतमिरे, प्रमोद जगताप, नंदकुमार चाळके, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

