

- rat१८p८.jpg-
२५N४५९६३
चिपळूण : खेर्डी बाजारपेठेत मूर्ती, पुतळे खरेदीसाठी शिवभक्तांची वर्दळ वाढली आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे खरेदीसाठी शिवभक्तांची वर्दळ
चिपळूण परिसरात अनेक ठिकाणी विक्री; युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : शिवजयंती सोहळ्यानिमित्त बुधवारी (ता. १९) गावोगावी उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे तयार असलेले विविध उंचीचे पुतळे खरेदीसाठी शिवभक्तांची वर्दळ वाढलेली आहे. ‘जय शिवाजी, जय भवानी’ असा जल्लोष करत युवक व ज्येष्ठ नागरिक पुतळे खरेदी करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या घरी असावा, या भावनेने पुतळा खरेदी करण्याकडे युवकांचा कल वाढलेला आहे. येथे विविध उंचीचे अर्ध्या फुटापासून अडीच फुटापर्यंतचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. शंभर रुपयांपासून सातशे रुपये किमतीचे पुतळे येथे विक्रीसाठी राजस्थान येथील धर्मेंद्र राठोड या कारागिराने उपलब्ध करून दिले आहेत. चिपळूण शहर, खेर्डी, शिरगांव, पोफळी, सावर्डे, अलोरे, मार्गताम्हाणे बाजारात पुतळा घेण्यासाठी लगबग सुरू होती. शिरगावमधील काही मूर्तिकारांकडे छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य महापुरुष, विविध देवतांच्या मूर्ती तयार केल्या जातात. राजस्थान भागातील हे कारागीर आहेत. पुतळे तयार करताना व विक्री करताना सर्व पावित्र्य राखले जाते. गेल्या तीन दिवसात अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विविध आकारातील पुतळे खरेदी केले आहेत. खरेदीला शिवभक्तांचा चांगला प्रतिसाद आहे, असे कारागीर राठोड यांनी सांगितले.
---
दसपटीत छत्रपती शिवरायांचे वास्तव्य
चिपळूण येथील दसपटी परिसरात छत्रपती शिवरायांचे वास्तव्य होते. दळवटणे भागात महाराजांच्या फौजेमधील घोडे विश्रांतीसाठी थांबायचे, असे दाखले इतिहासात मिळतात. त्याचबरोबर कोकणातील विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याचे दाखले आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.