गुहागरात आज शिवजन्मोत्सव सोहळा

गुहागरात आज शिवजन्मोत्सव सोहळा
Published on

-rat१८p३.jpg -
२५N४५९५१
गोपाळगड किल्ला.
----
गुहागरात आज शिवजन्मोत्सव सोहळा
शिवपादुका पालखी मिरवणूक ; दुर्गादेवी मंदिरात महिलांकडून औक्षण
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १८ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या गुहागर येथील शिवतेज फाउंडेशन आणि गुहागरवासीय यांच्यावतीने उद्या (ता. १९) शिवजयंतीनिमित्त शिवपादुका पालखी मिरवणुकीचे आयोजन केले आहे. या निमित्त सकाळी ८ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शिवपादुका पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांची पालखीतून शिवरथ यात्रा गेली काही वर्षे शृंगारतळी येथून काढली जात आहे. या यात्रेला उशीर होत असल्याने यावर्षी गुहागर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पादुकांची पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर बाजारपेठमार्गे श्री देव व्याडेश्वर मंदिर तेथून सकाळी ९.३० वाजता वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात पालखीचे आगमन होईल. तिथे छत्रपती शिवरायांच्या पादुकांची आणि दुर्गा भवानीमाता यांची भेट होईल. या वेळी शिवपादुका व दुर्गा भवानी मातेचे परिसरातील १०१ महिलांच्यावतीने औक्षण करण्यात येणार आहे. ज्या महिलांना औक्षण करायचे असल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी देवस्थानच्यावतीने शिवप्रेमींसाठी प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तिथून शिवपादुकांची पालखी मिरवणूक वरचापाट बाग, रानवीमार्गे अंजनवेल बाजारपेठेत दाखल होईल. त्याचवेळी गुहागर आणि शृंगारतळी येथून आलेल्या मिरवणुका अंजनवेल ग्रामस्थांच्या उपस्थितीत गोपाळगडापर्यंत जातील. या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पादुकापूजन व ध्वजवंदन करून शिवजयंती उत्सवाची सांगता होईल. या सोहळ्यासाठी तालुक्यातील असंख्य शिवभक्त व गुहागरवासियांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवतेज फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
----
असा आहे गोपाळगडचा इतिहास
गोपाळगड किल्ला विजापूरच्या आदिलशहाने १६व्या शतकात बांधला. इ. स. १६६० मध्ये शिवछत्रपतींनी तो जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगल आक्रमणाच्या धामधुमीचा फायदा घेऊन सिद्दी खैरातखानने तो इ. स. १६९९ मध्ये जिंकला. त्यानंतर इ. स. १७४४ मध्ये तुळाजी आंग्रेने तो जिंकेपर्यंत तो सिद्दीच्याच ताब्यात राहिला. या काळात सिद्दीने किल्ल्याचा विस्तार करून त्यात सुधारणा केल्या नंतर तुळाजी आंग्रेनेही त्याचा विस्तार केला. इ. स. १८१८ रोजी कर्नल केनडी याने किल्ल्याचा ताबा घेतला व नंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत तो ब्रिटिशांच्याच ताब्यात होता. जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा याचे नाव गोपाळगड करण्यात आले. या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवतेज फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com