पूज्य गांधी प्रतिष्ठानतर्फे चित्रकला स्पर्धा

पूज्य गांधी प्रतिष्ठानतर्फे चित्रकला स्पर्धा

Published on

चित्रकला स्पर्धेत अनन्या, तनिष्का प्रथम
पूज्य गांधी प्रतिष्ठान ; विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः गांधारेश्वर येथील महात्मा गांधीजींच्या समाधीला ७७ वर्षे पूर्ण झाल्याने पूज्य गांधी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कै. तात्यासाहेब कोवळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पूज्य गांधी प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्राथमिक गटात अनन्या भोबेकर आणि माध्यमिक गटात तनिष्का काणेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
गांधीजींच्या रक्षाकळस समाधीसमोर निसर्गरम्य परिसरात प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रकला स्पर्धेवेळी कोवळे कुटुंबीयांमधील तात्यांचे भाऊ निवृत्त पोलिस उपसंचालक कुमार कोवळे, चंद्रकांत कोवळे, तात्यांचे नातू व सामाजिक कार्यकर्ते निहार कोवळे व समीर कोवळे, सूचयअण्णा रेडीज, बापू काणे, सुरेश तांबट, अमित पिसे आदी उपस्थित होते. स्पर्धेत प्राथमिक गटात अनन्या भोबेकर (एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल), आर्या पाटील (न्यू इंग्लिश स्कूल सती), अनुष्का घाग (गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे), आरोही कांबळे (परांजपे मोतीवले हायस्कूल), सिद्धी ठाकूर (क्रिस्त ज्योती हायस्कूल), झोया खोत (अली पब्लिक स्कूल) यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले. माध्यमिक गटात तनिष्का काणेकर (न्यू इंग्लिश स्कूल सती चिंचघरी), सुजल तोडकर (गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे ), आयुष दहिवलकर (न्यू इंग्लिश स्कूल पाग), दुर्वा शिंदे (मेरी माता स्कूल), केतन जाधव (न्यू इंग्लिश स्कूल सती चिंचघरी) यांनी यश मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com