पीपीटी स्पर्धेत शर्मिला प्रथम

पीपीटी स्पर्धेत शर्मिला प्रथम

Published on

महिला आरोग्यावर
‘डीबीजे’त व्याख्यान
चिपळूण : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष व कोठारी ग्रुपच्या अल्बर्ट डेविड लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी महिला आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर चिपळूणच्या घाणेकर नर्सिंग होम येथील स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. पूजा बेडेकर यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमात डॉ. बेडेकर यांनी पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थिनींना पीसीओएस, पीसीओडीसारख्या गंभीर आरोग्यसमस्यांवर सखोल माहिती दिली. या समस्यांचे शरीरावर होणारे वाईट परिणाम व त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन केले. या व्याख्यानाला महाविद्यालयातील ७० विद्यार्थिनी उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनीदेखील विद्यार्थिनींशी संवाद साधला.
....
मराठा क्रांती मोर्चातर्फे
शिवजयंती उत्सव
चिपळूण ः मराठा क्रांती मोर्चा व मराठा चिपळूण तालुक्याच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रसिद्ध व्याख्याते व इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांचे उत्तम प्रशासक शिवछत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे तसेच हळदीकुंकू कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. हे दोन्ही कार्यक्रम इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये होणार आहेत. चिपळूण तालुका मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराजांच्या जीवनकार्यावर माहितीपूर्ण व्याख्यान होणार आहे. नव्या पिढीला महाराजांचे जीवनकार्य कसे होते ही माहिती देण्यासाठी शिवचरित्रावर पीएचडी केलेले प्रसिद्ध अभ्यासक व इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे याशिवाय हळदीकुंकूचाही कार्यक्रम होणार आहे. तरी या दोन्ही कार्यक्रमाला बहुजन समाजातील सर्वांनी उपस्थितीत लावावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
---
आंबडस-चिरणी फाटा येथे
शनिवारपासून क्रिकेट स्पर्धा
चिपळूण : खेड तालुका बौद्ध समाजसेवाअंतर्गत सातगाव बौद्ध समाजसेवा संघ स्थानिक आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान आंबडस-चिरणीफाटा येथील मैदानात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या, तृतीय व चतुर्थ संघास रोख बक्षीस, आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला २५ हजार रुपये, उपविजेत्या संघास १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक संघास ६ हजार रुपये व चतुर्थ क्रमांक संघास ४ हजार रुपये रोख व प्रत्येकी संघास आकर्षक चषक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात येणार आहे. याचबरोबर वैयक्तीक पारितोषिकेदेखील ठेवण्यात आली आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक खेळाडूस आकर्षक चषक आणि टीशर्ट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com