

रत्नागिरी विमानतळाचे काम १० टक्के पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ः रत्नागिरी विमानतळाच्या नूतनीकरणाची प्रगती सुरू आहे. आरसीएसअंतर्गत १० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत रत्नागिरी विमानतळाचा पुनर्विकास स्थिर प्रगती करत आहे. १० टक्के काम आधीच साईटवर पूर्ण झाले आहे. ५५.५६ कोटी रुपयांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्यासाठी पर्यटनाला आणि प्रदेशांतील आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी सज्ज आहे. ज्यात पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी साईट देखरेखीचे महत्व अधोरेखित केले. अपग्रेड केलेल्या विमानतळावर सुमारे ३.३९० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली अत्याधुनिक पॅसेजर टर्मिनल बिल्डिंग असेल जी प्रतितास १२५ प्रवाशांना हाताळण्यासाठी डिझाईन केलेली असेल. ९५० चौरस मीटरचा युटिलिटी ब्लॉक तिथे उभारला जाणार आहे. विमान वाहतूक पायाभूत सुविधांव्यतिरिक्त विकास आराखड्यात प्रतिकात्मक व सांस्कृतिक घटकांचा समावेश आहे. डोर्श प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून काम करताना व न्याती कंत्राटदार म्हणून काम करत असल्याने पुनर्विकासाचे उद्दिष्ट रत्नागिरीला एक प्रमुख विमान वाहतूककेंद्रात रूपांतरित करणे, हे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची आणि प्रदेशांच्या आर्थिक आणि पर्यटनक्षेत्रांना पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये रत्नागिरी विमानतळाविषयीची माहिती प्राधिकरणातर्फे दिली गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.