मुणगे येथे आज ‘कृती-विकृती’ नाट्यप्रयोग

मुणगे येथे आज ‘कृती-विकृती’ नाट्यप्रयोग
Published on

मुणगे येथे आज
‘कृती-विकृती’
मुणगे ः येथील रिक्षा चालक-मालक संघ, व्यापारी आणि मित्रमंडळातर्फे बुधवारी (ता. १९) शिवजयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त रात्री १० वाजता स्वामी माऊली दशावतार मंडळाचे डोंगरपाल (ता. सावंतवाडी) नाटक ‘कृती-विकृती’ होणार आहे. सकाळी ९ वाजता शिवजयंती कार्यक्रम, ९.३० वाजता श्रींची महापूजा, १० वाजता आरती, १०.३० वाजता तीर्थप्रसाद, दुपारी १२ ते ३ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्री ८ ते १० वाजेपर्यंत स्थानिक नवविकास प्रसादिक भजन मंडळ देऊळवाडीचे बुवा संतोष गुरव यांचे संगीत भजन व त्यानंतर दशावतारी नाटक होणार आहे. या कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रिक्षा चालक-मालक संघ, व्यापारी आणि मित्रमंडळ भगवती मंदिर मुणगे यांनी केले आहे.
---
श्रावण येथे २६ ला
महाशिवरात्र उत्सव
कुडाळ ः श्रावण येथे (ता. मालवण) परब मित्रमंडळ मुंबईतर्फे २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ७ वाजता अभिषेक, ९ वाजता श्रींची महापूजा, ११ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, ३ ते ६ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी ४ वाजता सुस्वर भजने, रात्री ९ वाजता जिल्हास्तरीय खुली एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहे. यासाठी अनुक्रमे १११११ व चषक, द्वितीय ७७७७ व चषक, तृतीय ५५५५ व चषक, उत्तेजनार्थ २२२२ रुपयांची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी अजय परब यांच्याशी संपर्क साधावा. सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परब मित्रमंडळ, मुंबई-श्रावण वरची परबवाडी, श्री देव लिंगेश्वर विकास मंडळ, श्रावण खालची परबवाडी यांनी केले आहे.
...............
सावंतवाडीत आज
शिवजयंती सोहळा
सावंतवाडी ः शहरातील तिलारी कॉलनी रोड, न्यू खासकिलवाडा येथील शिवप्रसाद कला व क्रीडा मंडळातर्फे उद्या (ता. १९) शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सायंकाळी ७ वाजता श्री सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, आवेरे (ता. वेंगुर्ले) यांचा ‘कालरात्र महिमा’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सकाळी पूजन आदी कार्यक्रम होणार आहेत. नाट्यप्रयोग व शिवजयंती कार्यक्रम तेथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गुरू गावडे यांच्या घरानजीक होणार आहेत. शिवप्रेमी व नाट्यरसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवप्रसाद कला व क्रीडा मंडळ न्यू खासकीलवाडा, सावंतवाडीने केले आहे.
................
कोळोशीत आज
‘भक्ती महिमा’
नांदगाव ः शिवप्रतिष्ठान कोळोशीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन उद्या (ता. १९) केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कोळोशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, ग्रामपंचायत ते कोळोशी गावठण अशी महिला ढोल पथकाची भव्य मिरवणूक, दुपारी २ वाजता हळदीकुंकू समारंभ, लहान मुलांसाठी विविध फनी गेम्स, सायंकाळी ५ वाजता स्थानिक भजने, रात्री ८ वाजता लकी ड्रॉ, १० वाजता श्री पावणादेवी लोककला दशावतारी नाट्यमंडळ हरकुळ खुर्द यांचा ‘भक्ती महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठानने केले आहे.
---
कुडाळात २ मार्चला
सेवानिवृत्तांची सभा
कुडाळ ः सेवानिवृत्त बॅंक कर्मचाऱ्यांची जाहीर सभा २ मार्चला येथील मराठा समाज हॉलमध्ये दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार आहे. या सभेत मार्गदर्शन करण्यासाठी बॅंक कर्मचारी चळवळीतील ज्येष्ठ नेते विश्वास उटगी उपस्थित राहणार आहेत. पेन्शन अपडेशन अधिकार म्हणजे काय व तो कसा मिळवता येईल, पेन्शन अपडेशन, एक्स ग्रेशिया याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांनी या सभेस उपस्थित राहुन या ज्वलंत प्रश्नाबाबत अद्ययावत माहिती घ्यावी, असे आवाहन उपाध्यक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र रिटायरिज असोसिएशन कोल्हापूर-सिंधुदुर्ग व गोवा विभागातर्फे नीता गोवेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com