

46008
आत्मविश्वासाने आव्हाने पार करा
वैभव नाईक ः माणगाव शाळेचा सुवर्ण महोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः माणगावसारख्या ग्रामीण भागातील शाळेने सुवर्ण महोत्सवी वर्षात केलेली वाटचाल निश्चितच कौतुकास्पद आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना आव्हाने अनेक आहेत. या आव्हानांना प्रत्येक विद्यार्थ्याने सामोरे जाऊन भविष्यात कोणत्या दिशेने वाटचाल करावी हे स्वतःच ठरवावे, असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी माणगाव येथे केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माणगाव या प्रशालेला ५० वर्षे पूर्तीनिमित्त सुवर्ण महोत्सव कार्यक्रम उत्साहात झाला. यानिमित्त रविवारी (ता. १६) आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जिल्हा परिषद सदस्य रमा ताम्हाणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, माणगाव उपसरपंच बापू बागवे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, विभाग संघटक कौशल जोशी, माणगाव शहर प्रमुख सचिन भिसे, गटशिक्षण अधिकारी संदेश किंजवडेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक नानचे, कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश कदम, मुख्याध्यापक संजना पेडणेकर, सहाय्यक शिक्षक बाबाजी भोई, उद्योजक काका केसरकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील सावंत, ग्रामपंचायत सदस्य बंटी भिसे, मनाली धुरी, अवधुत गायचोर, संदीप सावंत, संजना धुरी, काजल नाईक, बाबुराव कदम, अनुष्का तेली, गुरू माणगावकर, रुपेश नानचे, प. भ. चव्हाण, माजी शिक्षक खांबकर, पंढरी कदम, श्री. कांबळी आदींसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सहायक शिक्षक बाबाजी भोई यांनी केले.
---
‘प्रशालेची वाटचाल कौतुकास्पद’
दरम्यान, प्रशालेची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे सांगत नाईक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यापुढेही सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून माजी आमदार नाईक यांच्या माध्यमातून प्रशालेत उभारलेल्या सभामंडपाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रशालेच्यावतीने नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.