जिव्हाळा सेवाश्रमाचा वर्धापन विविध उपक्रमांनी

जिव्हाळा सेवाश्रमाचा वर्धापन विविध उपक्रमांनी

Published on

४६०१२

जिव्हाळा सेवाश्रमाचा वर्धापन विविध उपक्रमांनी

मान्यवरांची उपस्थिती; सत्कार समारंभासह रंगले सांस्कृतिक कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी, रायवाडी कुडाळ जिव्हाळा सेवाश्रमाचा ९ वा वर्धापन दिन विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
अन्वेष बिर्जे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला. हळदीकुंकू समारंभ, योगेश प्रभू व त्यांच्या शिष्यांचा संगीत कार्यक्रम, आनंद मोर्ये यांच्या शिष्यांचा सोलो वादन कार्यक्रम झाला. सायंकाळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी केलेल्या कार्यासाठी पुरस्कार प्रदान सोहळा झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक द‌त्ताजी सामंत उपस्थित होते. हे पुरस्कार दत्ताजी सामंत, केंद्रप्रमुख उत्तम हरमळकर, बालकलाकार आरव आईर, मालवणी भाषा तसेच इतर प्रबोधन करणारे सहदेव धर्णे, एस. आर. एम. कॉलेजचे प्रा. प्रशांत केरवडेकर, तसेच ‘मालवणी बायल माणूस’ निशा आजगावकर यांना पुरस्कार प्रदान केला.
या प्रसंगी माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे, उपसरपंच सौ. अस्मिता गावडे, पोलिसपाटील चंद्रशेखर परब, मालवण माजी नगरसेवक दीपक पाटकर, उमेश देसाई, सुरेश गावडे, स्मिताली गावडे, बचतगट प्रमुख सौ. संजना सरमळकर, निवती पोलिस उपनिरिक्षक नितीन पाटील, पोलिस उपनिरीक्षक दिलीप शेट्ये, पोलिस अंमलदार नितीन शेडगे, जिव्हाळा सेवाश्रम अध्यक्ष सुरेश बिर्जे, उपाध्यक्ष राजू बिर्जे, सुंदर मेस्त्री, बाबिदास गावडे, जयप्रकाश प्रभू, नाना राऊळ, शोभा बिर्जे, साक्षी बिर्जे, पुनम बिर्जे, दत्तात्रय पाटकर, दिपाली पाटकर, गितांजली बिर्जे, गुरुवर्य योगेश प्रभू, गुरुवर्य आनंद प्रभू , एसआरएम कॉलेजच्या च्या प्राध्यापिका यशश्री नरसिंह प्रभू, मिताली गावडे यांचा सत्कार करण्यात आला.
अन्वेषच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप केले. कराओकेवर सदाबहार गाण्याचा कार्यक्रम योगेश प्रभू आणि शिष्यांनी सादर केला. यावेळी श्री. कुडाळकर, भाई साटेलकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बिर्जे, संदिप बिर्जे, आर्या बिर्जे, स्वरा बिर्जे, सुमेध बिर्जे, श्रेया बिर्जे, विवेक पाटकर, राधिका बिर्जे उपस्थित होते. सुंदर मेस्त्री यांनी निवेदन केले. संतोष सांगळे व प्राजक्ता परब यांनी सूत्रसंचलन केले. जयप्रकाश प्रभू यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com