आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा

आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा
Published on

आपत्ती व्यवस्थापनावर
देव महाविद्यालयात कार्यशाळा
रत्नागिरी, ता. १८ : देव, घैसास, कीर कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नागरी संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने पाचदिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा झाली. कोणतीही आपत्ती आल्यावर त्या आपत्तीला कशाप्रकारे सामोरे जावे तसेच आपत्तीग्रस्त लोकांची कशाप्रकारे मदत करावी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती असावे, हा याचा उद्देश होता. प्रशिक्षण देण्यासाठी लहू माळगावी व अनिल गावित उपस्थित होते. विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण म्हणजे काय, नागरी संरक्षणाचे उद्देश काय आहेत, नागरी संरक्षणाच्या सेवा कोणकोणत्या आहेत, नागरी संरक्षण संघटना कशी कार्य करते याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दुर्घटनास्थळी वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी प्रथमोपचार पद्धत, एखाद्याची श्वसनक्रिया काही कारणांमुळे बंद पडली असता त्याला कृत्रिम श्वसन कसे दिले जाते, त्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत व त्याचे उपयोग काय आहे हे शिकवले. स्ट्रेचर उपलब्ध नसताना हातांच्या मदतीने रुग्णाला कशाप्रकारे वाहून नेले जाते तसेच आग लागली असता अग्निशामक यंत्राचा कशाप्रकारे वापर करावा याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com