कुडाळला आजपासून धार्मिक कार्यक्रम

कुडाळला आजपासून धार्मिक कार्यक्रम

Published on

कुडाळला आजपासून
धार्मिक कार्यक्रम
कुडाळ ः कुडाळ हिंदू कॉलनी येथील साई मंदिरचा २५ वा वर्धापन दिन सोहळा उद्यापासून (ता. १९) शुक्रवारपर्यंत (ता. २१) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या (ता. १९) सकाळी ८ वाजता साई पूजन, गणेश पूजन, पुण्याहवाचन, प्राकारशुद्धी, ९ वाजता उदकशांती, आरती तीर्थप्रसाद, गुरुवारी (ता. २०) सकाळी ७ वाजता साई पूजन, ८ वाजता साईबाबांची पालखी, शोभायात्रा व देव कुडाळेश्वर भेट, ११ वाजता आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.३० वाजता हिंदू कॉलनी मित्रमंडळ आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हिंदू कॉलनी मित्रमंडळ आणि साई संगीत क्लासेस कुडाळ व सहकारी यांचे ‘साई कथामृत गीतनृत्य’, शुक्रवारी (ता. २१) पहाटे ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता साई मूर्तीची पूजा, ९ वाजता श्रींची महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वाजता हिंदू कॉलनी मित्रमंडळ प्रस्तुत ‘तेजोमय नादब्रह्म’ हा कार्यक्रम होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदू कॉलनी मित्रमंडळाने केले आहे.
...................
‘शिरोडा बाजारपेठ
रस्त्याची दुरवस्था’
वेंगुर्ले ः चिनार्ली ब्राह्मण ते शिरोडा बाजारपेठ रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वेंगुर्ले युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश परब यांनी आमदार दीपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिरोडा-रेडी मार्गावरील चिनार्ली ब्राह्मण ते शिरोडा बाजारपेठ हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यातूनच वाहनांची ये-जा सुरू असताना धुरळा उडून सर्वांना त्रास होत आहे. यापूर्वी ठेकेदाराने दोनवेळा खड्डे बुजविण्याचे काम केले. तरीही सद्यस्थितीत हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. काही दिवसांत शिरोडा माऊली मंदिरात सहस्त्रचंडी उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाला भाविकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू राहणार आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीपूर्वी हा रस्ता वाहतुकीस सुयोग्य करून शिरोडावासीयांना सहकार्य करावे, अशी मागणी परब यांनी केली आहे.
---
ओटवणे ग्रामस्थांतर्फे
आज शिवजन्मोत्सव
ओटवणे ः शिवजयंतीनिमित्त ओटवणे ग्रामस्थांतर्फे उद्या (ता. १९) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला तरुण-तरुणींसह महिला व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर गावात तसेच बांदा-दाणोली जिल्हा मार्गावरील विलवडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com