सावंतवाडी शहरात रविवारी स्वच्छता मोहीम राबवा

सावंतवाडी शहरात रविवारी
स्वच्छता मोहीम राबवा
Published on

46038

सावंतवाडी शहरात रविवारी
स्वच्छता मोहीम राबवा

परीट समाजातर्फे पालिकेला निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः स्वच्छतेचे महान पुजारी समाज सुधारक श्री संत गाडगेबाबा यांच्या नावाने संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर व पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे केली.
संत गाडगेबाबा महाराज परीट समाज सिंधुदुर्ग जिल्हा व सावंतवाडी तालुका सेवा संघ यांच्यावतीने रविवारी (ता. २३) जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संत गाडगेबाबा महाराज हे स्वच्छतेचे पुरस्कर्ते होते. भजन, कीर्तन या माध्यमातून त्यांनी स्वच्छताविषयक समाज सुधारणेचे व्रत स्वीकारले होते. यानिमित्त सावंतवाडी येथे साफसफाई करण्याचे योजले असून नगरपरिषदेमार्फत सकाळी मच्छीमार्केट व भाजी मार्केट या ठिकाणी तसेच संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवून सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली. शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपरिषद शहरात सर्व प्रभागांमध्ये नेहमीच स्वच्छता मोहीम राबवित असते. या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य या संदर्भात जनजागृती करण्यात येते. या स्वच्छता मोहिमेत सर्व शाळा, हायस्कूल, कॉलेज तसेच सामाजिक संस्था यांना सामावून घ्यावे, असे आवाहन भालेकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी दिलीप भालेकर, राजेंद्र भालेकर, दीपाली भालेकर, अनिता होडावडेकर, अनुजा होडावडेकर, संजय होडावडेकर, प्रदीप भालेकर, दयानंद रेडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com