देवरूख शाळेस दहा संगणक भेट

देवरूख शाळेस दहा संगणक भेट

Published on

देवरूख नं. २ शाळेस
दहा संगणक भेट
रत्नागिरी ः अपनी पाठशाळा या संस्थेने जिल्हा परिषद शाळा देवरूख नं. २ ला दहा संगणक भेट दिले. या संगणक कक्षाचे उद्‍घाटन विस्तार अधिकारी तानाजी नाईक यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिजीत शेट्ये, शाळा सुधार समिती अध्यक्ष बापू गांधी, सचिव रविकांत कदम, तुषार थरवळ, विजय सराटे व मीना सराटे, केंद्रप्रमुख निकिता नलावडे, केंद्रप्रमुख भाटकर, शाळेतील शिक्षक उपस्थित होते. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी व शाळेच्या परिसरातील महिला यांना संगणकाचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल यशवंतराव यांनी अपनी पाठशाळा संस्थेशी संपर्क साधला होता. शाळा सुधार समितीच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
---
पाणी गुणवत्तेवर मार्गदर्शन
रत्नागिरी ः पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखण्यात ग्रामस्थांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले. त्यांनी जलजीवन मिशनअंतर्गत हस्तांतरण प्रक्रिया, पाणी गुणवत्ता या विषयी पदाधिकाऱ्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या यावर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, केंद्रातील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण खासगी हॉटेलमध्ये झाले.
---
महामार्गावर
धुळीचे लोट
संगमेश्वर ः आंबेड ते तळेकांटेदरम्याने मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरल्याने दुचाकीचालकांची गैरसोय होत असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे तसेच मार्गावर खडी पडल्यामुळे अनेक छोटी वाहने घसरत आहेत. काही ठिकाणी काँक्रिचे तर काही ठिकाणी कच्चे रस्ते आहेत. हा रस्ता संपला की, त्या बाजूला पाच ते सहा इंचाचा कट असतो. तेथे गाड्या आदळतात. त्यामुळे प्रवाशांनाही दुखापत होण्याची भीती आहे. त्याशिवाय गाडीचेही नुकसान होते. या विषयी संगमेश्वरवासियांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
---
बँक ऑफ इंडियाकडून
परशुराम मंदिराला जनरेटर
चिपळूण : बँक ऑफ इंडियामार्फत भगवान श्री परशुराम चरणी जनरेटर देण्याचा कार्यक्रम झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी श्री परशुराम मंदिराचे विश्वस्त अभय सहस्रबुद्धे यांनी देवरे यांचे स्वागत केले. या वेळी सहस्रबुद्धे म्हणाले, भगवान श्री परशुराम मंदिराला जनरेटर मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. या मंदिरात भारतातून तसेच परदेशातून भाविक दर्शनाला येतात; मात्र, वीज गेल्यामुळे रात्री भाविकांची तसेच पुजाऱ्यांची गैरसोय होते. बँक ऑफ इंडिया झोनल मॅनेजर देवरे यांनी तत्काळ सीएसआर फंडातून जनरेटर उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी बँक ऑफ इंडियाच्या चिपळूण शाखेचे व्यवस्थापक सर्फराज पटेल, अधिकारी अश्विन चौधरी, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अधिकृत विक्रेते राहुल सावंत, मिलिंद सकपाळ, ग्रामस्थ मंगेश शितप उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com