शिवरायांच्या तेजोमय पराक्रमाची साक्ष म्हणजेच ‘नरसिंह शिवराय’
46056
शिवरायांच्या तेजोमय पराक्रमाची साक्ष म्हणजेच ‘नरसिंह शिवराय’
कुडाळात आज आयोजन; अफजल खान वधावर आधारित ऐतिहासिक नाटक
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १८ ः शिवजयंतीनिमित्त ‘नरसिंह शिवराय’ या ऐतिहासिक नव्या नाट्यकलाकृतीसाठी उदंड प्रतिसाद लाभत आहे. शिवरायांच्या जीवनातील सर्वांत रोमहर्षक प्रसंग अफजल खान वधावर आधारित या ऐतिहासिक नाटकाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. धर्माभिमान जागृत करणारं आणि शिवरायांच्या तेजोमय पराक्रमाची साक्ष देणारं हे नाटक प्रत्येक शिवप्रेमीने पहावं असं आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मळेवाड (ता.सावंतवाडी) तर शिवजयंती उत्सवानिमित्ताने उद्या (ता.१९) कुडाळ येथे रात्री आठ वाजता या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे.
गेली अनेक वर्षे शिव गणेश प्रोडक्शन सिंधुदुर्ग, मुंबई ही संस्था ऐतिहासिक नाटकांची निर्मिती करते. तसेच अनेक ठिकाणी ऐतिहासिक नाटकांचे प्रयोग सादर करीत आहे. ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाचे ६५ यशस्वी प्रयोगापर्यंत या संस्थेने घोडदौड केली. राज घराण्याकडून संपूर्ण प्रयोगालाच मिळालेल्या ‘वन्स मोअर’मुळे नाट्यसृष्टीत इतिहास घडवणारं नाटक म्हणून या नाटकाची नोंद घेतली जात आहे.
‘इथे ओशाळला मृत्यू’ हे अजरामर नाटक शिवगणेश प्रोडक्शन सिंधुदुर्ग मुंबई, या संस्थेच्या माध्यमातून रसिकांची सेवा करीत आहे. इतकच नाही तर प्रत्यक्ष छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी या संस्थेने आपली नाट्यसेवा रुजू करून तमाम शंभू भक्तांचे प्रेम अनुभवले. याच संस्थेच्या माध्यमातून नवीन ‘नरसिंह शिवराय’ या नाटकाची निर्मिती झाली आहे. हे इतिहासातील पहिलं ट्रिक्ससिन युक्त नाटक असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा संयम, नियोजन, कर्तव्यदक्षता, धर्मप्रेम असे अनेक पैलू उलगडणारं आहे. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन नाट्यदिग्दर्शक गणेश ठाकूर यांनी केले आहे. दरम्यान, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मळेवाड (ता.सावंतवाडी) तर शिवजयंती उत्सवा निमित्ताने उद्या (ता.१९) कुडाळ येथे रात्री आठ वाजता या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. शिवभक्तांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
------------------
नाटकातील यशस्वी कलाकार
प्राध्यापक मिलिंद कासार, डॉ. सोनल लेले, पत्रकार संदेश देसाई, ॲड. कृष्णा देसाई, अजिंक्य देसाई, विनय वाडकर, पवित्रा मातोंडकर, दीपक झोरे, मंदार जंगम, प्रशांत नाईक, हे यशस्वी कलाकार या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत. प्रकाश योजना पांडुरंग पांगम, ध्वनी संकलन सुभाष शिरोडकर, पार्श्वसंगीत सत्यवान नाईक, नेपथ्य रामा गवस व सागर झोळंबेकर, वेशभूषा वर्षा ठाकूर, प्रसिद्ध रंगभूषाकार नित्यानंद पेडणेकर हे या नाटकासाठी रंगभूषाकार म्हणून लाभले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

