माखजन बाजारपेठेची होणार पुरातून सुटका
- rat१८p२४.jpg
२५N४५९८८
ः संगमेश्वर ः माखजनच्या उपनद्यांमधील गाळ काढल्यामुळे या नद्याने मोकळा श्वास घेतला आहे.
- rat१८p३४.jpg
२५N४६०५७
संगमेश्वर ः गाळ काढण्याच्या कामाची पाहणी करताना आमदार शेखर निकम.
---
माखजन बाजारपेठेची पुरातून होणार सुटका
गडनदीच्या उपनद्यांमधील गाळ उपसा ; नियोजनमधून निधी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, १८ : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील गडनदीच्या उपनद्यांमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ते पुढील आठ दिवसात पूर्ण होणार आहे. गाळ काढल्यामुळे गडनदीच्या उपनद्यांनी मोकळा श्वास घेतला आहे तसेच माखजन बाजारपेठेची पुरातून सुटका होणार आहे. या मोहिमेमुळे नदीची खोली दहा ते बारा फूट झाली असून पात्रही रूंद झाले आहे.
गडनदीच्या उपनद्यांमध्ये गाळ साचल्यामुळे नदीचे पात्र उथळ झाले होते. त्यामुळे पावसाचे पाणी थेट माखजनच्या बाजारपेठेत शिरत होते. त्यामुळे व्यापाऱ्यांचे पावसाळ्यात दरवर्षी नुकसान होत होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी नदीपात्रातील गाळ काढणे गरजेचे होते. प्रामुख्याने माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम करणे गरजेचे होते. ग्रामस्थांनी या कामासाठी पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा नियोजन मंडळातून पूर नियंत्रण योजनेअंतर्गत २६ लाखांच्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि जलसंपदा विभागाने गाळ काढण्यास सुरवात केली. डिसेंबर २०२४ पासून दोन पोकलेनच्या साह्याने गाळ काढण्याचे काम सुरू झाले ते आतापर्यंत चालू आहे. परिसरातील ग्रामस्थ गाळ काढण्याच्या कामाची पाहणी करतात आणि जलसंपदा विभागाच्या कामगारांना योग्य त्या सूचना करतात. त्यामुळे मागील अडीच महिने गाळ काढण्याचे काम गतीने सुरू आहे. नदीतून काढलेला गाळ टाकण्यासाठी माखजनसह कासे, सारंग गावातील मोकळ्या जागा ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या ठिकाणी गाळ टाकण्यात आल्यामुळे पावसाळ्यात नदीपात्रात पुन्हा गाळ येणार नाही. हे काम करण्यासाठी तीन डंपर कार्यरत आहेत. आतापर्यंत ६५ हजार घनमीटर गाळ नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. हे काम अजून सुरूच राहणार आहे. मुसळधार पाऊस पडला की, गडनदीच्या पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत शिरते. त्यामुळे येथील व्यावसायिकांना सतर्क राहावे लागत होते. पावसाला सुरवात झाली की, दुकानातील माल सुरक्षित ठेवण्यासाठी
व्यापाऱ्यांची तारांबळ उडते. गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे हा पुराचा प्रश्न सुटेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्या काढलेल्या गाळामुळे नदीपात्रात पाणी वाहत असून, त्यावर किनारी भागातील लोकांनी कलिंगड लागवडीला सुरवात केली आहे. आपसूकच येथील गावातील पडिक जमिनीत दुबार शेती करता येईल.
दरम्यान, माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाची आमदार शेखर निकम यांनी पाहणी केली आणि ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. याला निधी देण्यासाठी आमदार निकम यांनी प्रयत्न केले होते.
---
नदी पात्र ३० मीटरने रूंदावले
गेली अडीच महिने नदीतील गाळ काढण्याचे काम चालू आहे. जलसंपदा विभागाच्या सहकार्यामुळे गाळ काढण्याच्या कामातील लोकांच्या निवासाची व्यवस्था नागरिकांनी केली. आतापर्यंत सुमारे ९०० मीटर नदीपात्रातील गाळ काढण्यात आला आहे. गाळ काढल्यानंतर माखजनसह सरंग आणि कासे गावाला फायदा होणार आहे. यापूर्वी नदी केवळ पाच फूट खोल होती. गाळ काढल्यामुळे ती दहा ते बारा फूट खोल झाली आहे. नदीचे पात्र ३० मीटरने रूंद झालेले आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक गावात गाळमुक्त नदी मोहीम राबवण्याची गरज आहे, असे माखजनचे सरपंच महेश बाष्टे यांनी सांगितले.
-----
नुकसान टाळता येणार
माखजन बाजारपेठेत २० दुकाने असून नदीकिनारी परिसरात ६० घरे आहेत. तसेच २१ एकर शेती आहे. पूरामुळे बाजारपेठेला मोठा फटका बसतो. भातशेतीचेही मोठे नुकसान होते. वर्षाला १० ते १२ लाखांचा फटका बसतो. गडनदीच्या उपनद्यांमधील गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे होणारे नुकसान टाळता येईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.
-------
कोट १
माखजन येथील गडनदीतील गाळ काढला जात आहे त्यामुळे ती गाळमुक्त होईल. हे काम पुढील चार दिवसात पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या कामाचा फायदा पावसाळ्यात स्थानिकांना होणार आहे तसेच नदीपात्रातील पाण्याचा उपयोग करून ग्रामस्थांना उन्हाळी शेतीही करता येईल.
- विनय साळुंखे, उपअभियंता पाटबंधारे विभाग अलोरे
---
दृष्टिक्षेपात
* गाळ काढल्याने पात्रात साठले पाणी
* किनाऱ्यावरील शेतात कलिंगड लागवड सुरू
* गाळ पुन्हा न येण्यासाठी कायम उपाय
* पावसाळ्यातील व्यापाऱ्यांची कसरत थांबणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

