भोसले इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी चमकले

भोसले इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी चमकले

Published on

46059

भोसले इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी चमकले

‘मेट्रोपल्स-रेक्स’ स्पर्धेत यश ः सुकळवाड ‘मेट्रोपॉलिटन’चा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील विद्यार्थ्यांनी मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट सुकळवाड येथे आयोजित केलेल्या ‘मेट्रोपल्स आणि रेक्स २०२५’ या नॅशनल टेक्निकल इव्हेंटमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले.
कॉलेजच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील १६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पैकी ६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. टेक्निकल पेपर प्रेझेंटेशनमध्ये सुयोग देसाई व संतोष शर्मा यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ट्रेझर हंटमध्ये सुयोग देसाई, संतोष शर्मा, संदेश कांबळे आणि रोहन मेस्त्री यांनी विजेतेपद पटकावले. रांगोळी स्पर्धेत रोहन मेस्त्री आणि हर्षद नाईक यांना उपविजेतेपद मिळाले. तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील अथर्व नार्वेकर आणि साईश ठकार यांनी ‘सेमी ह्युमनॉइड बॉट विथ इंटिग्रेटेड एआय’ या प्रोजेक्टसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. टेक्निकल डिबेटमध्ये अथर्व नार्वेकर आणि जानू खरात यांना उपविजेतेपद मिळाले.
तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील २२ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. पैकी ७ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. सर्किट मेकिंगमध्ये संदेश वेटे आणि लतिकेश मेस्त्री तर टेक्निकल पेपर प्रेझेंटेशनमध्ये रुपाली कटाले आणि अथर्व परब यांना उपविजेतेपद मिळाले. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये सायली गिरी आणि खुशी मांजरेकर यांना तर स्पॉट फोटोग्राफीमध्ये साहिल आरोलकर याला उपविजेतेपद प्राप्त झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com