शिवजयंतीनिमित्त आज ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा

शिवजयंतीनिमित्त आज ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा
Published on

‘जय शिवाजी जय भारत’ आज पदयात्रा
शिवजयंती; रत्नदुर्ग किल्ला भेटीनंतर क्रीडांगणावर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : शिवजयंती निमित्त उद्या (ता. १९) सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने उद्‍घाटन करणार आहेत. त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथून सकाळी ८ वाजता ''जय शिवाजी जय भारत'' पदयात्रा मोठ्या प्रमाणावर काढण्यात येणार आहे. ढोल पथक, लेझीम पथक, पुरस्कारप्राप्त खेळाडू यांच्या समवेत शाळा, महाविद्यालयातीन विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत.
पदयात्रेत एनसीसी, एनएसएस, नेहरू युवाकेंद्र, स्काऊट- गाईड, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा समावेश असणार आहे. ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथून सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. तिथून एसटी स्टॅंडमार्गे टिळक आळी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी येईल. तेथून शिवसृष्टी रत्नदुर्ग किल्लामार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे समारोप होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने पदयात्रेच्या पूर्वनियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, तहसीलदार राजाराम म्हात्रे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन कर्पे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे आदी उपस्थित होते.
-----
श्रमदानही करणार
या पदयात्रेदरम्यान मांडवी समुद्रकिनारा येथे श्रमदान करण्यात येणार आहे. ढोल व लेझीम पथक, विविध स्तरावरील पुरस्कारप्राप्त खेळाडू सहभागी होणार आहेत. उपविभागीय स्तरावरदेखील असे नियोजन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com