रत्नागिरीत ज्येष्ठ विधिज्ञांच्या आज तैलचित्रांचे अनावरण
rat१८p२५.jpg-
P२५N४५९९५
रत्नागिरी ः स्व. अॅड. बापूसाहेब परूळेकर, अॅड. केतन घाग, अॅड. मुसा डिंगणकर, अॅड. नारायण गवाणकर.
----
ज्येष्ठ विधिज्ञांच्या आज तैलचित्रांचे अनावरण
रत्नागिरीत जिल्हा न्यायालय; बार असोसिएशन हॉलचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : रत्नागिरीच्या वकिली क्षेत्राला मोठी परंपरा लाभली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जुन्या नामवंत ज्येष्ठ वकिलांनी अनेक खटले लढवले, सामाजिक कार्यात योगदान दिले अशा स्व. अॅड. बापूसाहेब परूळेकर, अॅड. केतन घाग, स्व. अॅड. मुसा डिंगणकर, स्व. अॅड. नारायण तथा नाना गवाणकर या ज्येष्ठांची तैलचित्रे न्यायालयाच्या इमारतीत लावण्यात येणार आहेत. त्याचे अनावरण उद्या (ता. १९) सकाळी १० वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर नवीन हॉलचे उद्घाटन केले जाणार असल्याचे रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी सांगितले.
ते म्हणाले, चौथ्या पिढीतील नामवंत वकील स्व. बापूसाहेब परूळेकर यांनी १९५० साली वकिलीला सुरवात केली. १९७७ व ८० सालात दोनवेळा रत्नागिरी मतदार संघातून बापूसाहेब संसदेवर निवडून गेले. नगरपालिका, रत्नागिरी बार असोसिएशन, पतितपावन मंदिर संस्था आदी संस्थांमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केली. अॅड. केतन घाग उर्फ काका मूळचे चिपळूण तालुक्यातील दहिवली गावचे. १९६४ साली त्यांनी सुरवातीला चिपळूण व नंतर रत्नागिरीला वकिलीला सुरवात केली. भेदक उलट तपासातून त्यांनी अनेक खटले लिलया जिंकले. बार असोसिएशन, मराठा मंदिर या संस्थेत त्यांनी जबाबदारीने काम केले.
स्व. अॅड. मुसा डिंगणकर हे मूळचे सैतवडे धामापूर येथील. १९३७ साली त्यांनी वकिलीला सुरवात केली. जिल्हा सरकारी वकील म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. जिल्हा होमगार्ड कमांडंट म्हणून त्यांचे विशेष योगदान होते तसेच स्व. अॅड. नारायण तथा नाना गवाणकर मूळचे मालवणचे. बेळगाव लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर प्रथम मालवणला नंतर १९४४ पासून रत्नागिरीत वकिलीला प्रारंभ केला. नानांची मुलगी रजनी कोकणातील पहिली महिला वकील. अशा या सर्व ज्येष्ठ वकिलांची तैलचित्रे लावली जाणार आहेत.
दरम्यान, रत्नागिरी बार असोसिएशन संघटनेची सभासद संख्या सहाशे असून, त्यांच्यासाठी संघटनेचा प्रशस्त हॉल असावा, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे होतील. त्यानुसार वर्षभरात हॉल पूर्ण झाला आहे. उद्या (ता. १९) सकाळी १० वाजता न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते या हॉलचे उद्घाटन होईल. यासाठी ३० लाखांचा निधी मिळाला आहे.
---
कोट
बार असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अनेकविध उपक्रम राबवता आले आहेत. असोसिएशनसाठी प्रशस्त हॉलसाठी उद्योगमंत्र्यांनी तातडीने निधी दिला व वर्षभरापूर्वीच उद्घाटन होत आहे, याबद्दल अपूर्व आनंद वाटतो.
- अॅड. विलास पाटणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

