कनेडी विद्यामंदिरमध्ये दहावी परीक्षेची व्यवस्था

कनेडी विद्यामंदिरमध्ये दहावी परीक्षेची व्यवस्था
Published on

कनेडी विद्यामंदिरमध्ये दहावी परीक्षेची व्यवस्था

कनेडी, ता. १८ ः येथील माध्यमिक विद्यामंदिर कनेडी केंद्रावर २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान दहावीची बोर्ड परीक्षा होणार आहे.
कनेडी केंद्रावर कनेडी हायस्कूल, कुंभवडे हायस्कूल, नाटळ हायस्कूल, नरडवे हायस्कूल, हरकुळ बुद्रुक, हरकुळ उर्दु शाळा, शिवडाव हायस्कूल, जांभवडे हायस्कूल या सर्व शाळेतील विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. या विद्यार्थ्यांचे केंद्रावर बैठक क्रमांक बीओ-२४९९९ ते बीओ२५२९२ असे असून यामध्ये मराठी माध्यमाचे ११४ विद्यार्थी, सेमी इंग्रजी १५३ विद्यार्थी, इंग्रजी माध्यम ९ विद्यार्थी आणि उर्दू माध्यमाचे १९ विद्यार्थी असे एकूण २९५ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा बैठक व्यवस्था इमारत क्रमांक दोन व तीन अशी आहे. वर्ग खोल्यांची संख्या दिव्यांग विद्यार्थ्यांसह १३ आहे. या परीक्षा काळात सर्व विद्यार्थ्यांनी पेपर सुरू होण्यापूर्वी ४५ मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर हजर रहावे, असे आवाहन परीक्षा केंद्र संचालक सुमंत दळवी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com