

46080
कलंबिस्त-सावरवाड रस्त्याचे लवकरच डांबरीकरण
संजू परब ः ग्रामस्थांनी छेडलेले उपोषण अखेर स्थगित
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः कलंबिस्त ते सावरवाड मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण व कार्पेटचे काम शुक्रवारपर्यंत (ता. २१) हाती घेतले जाईल. शिवाय दर्जेदार काम संबंधित ठेकेदाराकडून करून घेऊ, अशी ग्वाही शिंदे शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी उपोषणकर्त्यांना दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी छेडलेले उपोषण स्थगित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय कदम व सामाजिक कार्यकर्ते सुनील सावंत, रवींद्र तावडे, प्रथमेश सावंत, प्रल्हाद तावडे यांनी पुकारलेले उपोषण रात्री उशिरा मागे घेण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी आरोग्य सभापती ॲड. परिमल नाईक हे उपस्थित होते.
कलंबिस्त ते सावरवाड रस्त्याचे डांबरीकरण व कार्पेटचे काम अर्धवट स्थितीत ठेकेदाराने ठेवले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत हे काम करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी दिली होती; पण ठेकेदाराने ते काम हातीच घेतले नव्हते. त्यामुळे काल (ता. १७) सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर श्री. कदम व गावातील तरुणांनी उपोषण सुरू केले होते. सायंकाळी उशिरापर्यंत अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची मनधरणी केली; परंतु उपोषणकर्ते आपल्या मताशी ठाम होते. अखेर रात्री नऊ वाजता श्री. परब यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. रस्त्याचे निश्चितपणे डांबरीकरण करून घेण्याची हमी दिली. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी सचिन सावंत, सुनील सावंत, किरण सावंत, नीलेश पास्ते, सुशील राजगे, राजेश पास्ते, राजेश सावंत, रघुनाथ सावंत, रवींद्र तावडे आदी उपस्थित होते. या उपोषणाला कलंबिस्तमधील सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, शिरशिंगेचे सरपंच दीपक राऊळ, उपसरपंच सचिन धोंड, बाबा पास्ते, संदेश बिडये, राजू बिडये, अंतोन रोड्रिक्स, श्री. फर्नांडिस आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.