आडाळी रस्त्यावर २८ फेब्रुवारीपर्यंत गतिरोधक न बसवल्यास उपोषण

आडाळी रस्त्यावर २८ फेब्रुवारीपर्यंत 
गतिरोधक न बसवल्यास उपोषण
Published on

46087
आडाळी रस्त्यावर गतिरोधक न
बसवल्यास उपोषण ः गावकर

बांधकाम विभागाला दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. १८ ः बांदा-दोडामार्ग रस्त्यावर आडाळी येथे गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी उपोषण छेडण्याचा इशारा आडाळी सरपंच पराग गावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला. याबाबत गावकर यांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, बांदा-दोडामार्ग रस्त्यावर आडाळी माऊली मंदिर, एमआयडीसी गेट व मोरगाव बस थांबा येथे गतिरोधकांची आवश्यकता आहे. गेली अनेक वर्षे गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक करत आहेत. माऊली मंदिर येथे धोकादायक अवघड वळण असून, दोडामार्गच्या दिशेने तीव्र उतार आहे. त्यामुळे वाहने भरधाव येतात. याच परिसरात बसथांबा, प्राथमिक शाळा, मंदिर व औद्योगिक क्षेत्र आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अपघाताचा धोका लक्षात घेता माऊली मंदिर, एमआयडीसी गेट, मोरगाव बसथांबा येथे गती नियंत्रणासाठी गतिरोधक किंवा थर्मो प्लास्टिक रंब्लर बसविण्याची मागणी गावकर यांनी केली आहे. गेली दोन वर्षे जिल्हाधिकारी व बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदन दिली. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारातही हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी व बांधकाम उपविभाग यांनी पावसाळा संपताच कार्यवाही करू, असे लेखी पत्राद्वारे कळविले; मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने २६ डिसेंबरला बांधकामला स्मरणपत्र दिले. आता २८ फेब्रुवारीपर्यंत कार्यवाही न झाल्यास २ मार्चपासून ग्रामस्थांना सोबत घेऊन माऊली मंदिर समोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com