कुडाळ येथे उद्यापासून साई मंदिर वर्धापन दिन

कुडाळ येथे उद्यापासून 
साई मंदिर वर्धापन दिन
Published on

४६०९८

कुडाळ येथे उद्यापासून
साई मंदिर वर्धापन दिन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ : हिंदू कॉलनी कुडाळ व परिसरातील सर्व साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या हिंदू कॉलनीमधील श्री साई मंदिराचा २५ वा वर्धापन दिन सोहळा २० व २१ फेब्रुवारी कालावधीत होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (ता. २०) सकाळी ५ ते रात्री ११.३० पर्यंत उदकशांत, आरती, तीर्थप्रसाद, ७ वाजता श्री साई पूजन, ८ वाजता श्री साई पूजन, गणेश पूजन, पुण्याहवाचन, प्राकारशुद्धी, श्री साईबाबांची पालखी, शोभायात्रा व श्री देव कुडाळेश्वर भेट, ११ वाजता आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.३० वाजता हिंदू कॉलनी मित्रमंडळ आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रंगभूषाकार विलास कुडाळकर लिखित ‘गीत श्री साई कथामृत’ हा गीतनृत्य सादरीकरण कार्यक्रम हिंदू कॉलनी मित्र मंडळ, श्री साई संगीत क्लासेस व सहकारी सादर करणार आहेत. शुक्रवारी (ता. २१) सकाळी ५.३० वाजता काकड आरती, शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता काकड आरती, ७ वाजता श्री साई मूर्तीची पूजा, ९ वाजता श्रींची महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वाजता हिंदू कॉलनी मित्रमंडळ, कुडाळ प्रस्तुत ‘तेजोमय नादब्रह्म’ सुमधूर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. संकल्पना व निर्मिती संजय आठल्ये यांची असून भाग्यश्री आठल्ये-जोशी, प्रसन्न प्रभुतेंडोलकर व पूजा वालावलकर (तेरसे) गायन सादर करणार आहेत. त्यांना संगीत साथ शाम तेंडोलकर, सिद्धेश कुंटे, दिनेश वालावलकर, सचिन कुडतरकर करणार असून निवेदन प्रफुल्ल वालावलकर, ध्वनीसंयोजन किरण नाईक करणार आहेत. कार्यक्रम नर्मदा आई रंगमंच, श्री साई मंदिर, हिंदू कॉलनी, कुडाळ येथे होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदू कॉलनी मित्रमंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com