शेतकऱ्यांच्या स्वयंरोजगाराला कृषीचे बळ

शेतकऱ्यांच्या स्वयंरोजगाराला कृषीचे बळ
Published on

-rat१८p३१.jpg
२५N४६०३०
ः मंडणगड: तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीतून स्वयंरोजगार निवडला आहे.
-------
शेतकऱ्यांच्या स्वयंरोजगाराला कृषीचे बळ
मंडणगड तालुका ; भाजीपाला कीट वाटप, ३३१ हेक्टर क्षेत्रावर लागवड
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १८ ः तालुक्यातील रब्बी क्षेत्र वाढवण्याच्यादृष्टीने केलेल्या प्रयत्न, भाजीपाला कीटचे वाटप आणि दिलेले प्रोत्साहन यामुळे शेतकऱ्यांच्या स्वयंरोजगाराला कृषी विभागाचे बळ मिळाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामात शेती, पर्यटन आधारे आर्थिक विकासाची वाट तालुक्यासाठी महत्वाची ठरणारी आहे.
कर्मसिद्धांत डोळ्यासमोर ठेवून भाजीपाला, शेतीपूरक उद्योग, पर्यटन यातून शेतकरी आपले पाय रोवू पाहात आहेत. कृषी विभागामार्फत वाल, चवळी, कुळीथ, मूग, मसूर, भूईमूग या भाजीपाला लागवड कीट १०० हेक्टरसाठी वाटप करण्यात आले तसेच स्थानिक वाणअंतर्गत वाल व पावटा यांचाही सामवेश आहे. २०२३-२४ मध्ये २७० हेक्टर लागवड करणारा तालुका २०२४-२५ वर्षांत ६० हेक्टरने वाढ करून ३३१ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. यामध्ये पिंपळगाव, कोंझर, तिडे, टाकेडे, पिंपलोळी, कादवण, आंबवली, उमरोली या परिसरातील गावांचा समावेश आहे. पीएम किसानअंतर्गत ५८१० शेतकऱ्यांना अठरावा हप्ता वितरित करण्यात आला आहे. तसेच असुरक्षित आदिवासी समुहांतर्गत १७४ लाभार्थीना मंजुरी देण्यात आली आहे. शेतीआधारित उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या प्रक्रिया उद्योगाचे जाळे उभे राहण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर अनेक प्रयोग यशस्वी होऊ लागले आहेत. त्यात आंबा, काजू, फणस, कोकम, करवंद या कोकणी फळांवर प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक पुढाकार घेत आहेत. शेतीपर्यटन व सेवाउद्योगाच्या माध्यमातून नदी किनाऱ्यावरील गावे, धरण परिसर, खोऱ्यातून, खलाटी शेतात कृषी पर्यटन बहरू शकते. या संदर्भातील वाटचाल अधिक प्रशस्त करण्यासाठी रोडमॅप मात्र तयार करणे गरजेचे आहे. पर्यटन विकासाचे अनेक आयाम तालुक्यास लाभले आहेत. एकंदरीत पर्यावरणस्नेही सम्यक विकासाच्या आधारे तालुक्यात रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होत आहे.
---
दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन फायदेशीर
डेअरी फार्मिंगकडे येथील तरुण रोजगाराचे साधन म्हणून पाहू लागला आहे. दुधाच्या नैमित्तिक वापरासाठी पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून असणाऱ्या मंडणगड तालुक्यात मोठ्या दूध उत्पादन कंपन्यांनी आपली संकलन केंद्रे सुरू केल्याने दुग्ध उत्पादनाला वाव मिळाला आहे. त्याला कुक्कुटपालन व शेळीपालनाची तितकीच समर्थ साथ मिळू लागली आहे.
--------
कोट
तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणे कीट वाटप करण्यात आले. चालू वर्षात रब्बी क्षेत्र वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
- सोमनाथ अहिरकर, तालुका कृषी अधिकारी.


..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com