शिवस्मृती मंडळातर्फे मार्चमध्ये शिवजयंती उत्सव
शिवस्मृती मंडळातर्फे
मार्चमध्ये शिवजयंती
राजापूर, ता. १८ ः शहरातील शिवस्मृती मंडळातर्फे ४३ वा शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने शिवस्मृती मंडळाची सभा झाली. यामध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी दिलीप चव्हाण, तर खजिनदारपदी अविनाश पाटणकर यांची सवानुमते फेरनिवड करण्यात आली.
१९८३ मध्ये स्थापन झालेल्या शिवस्मृती मंडळाचे हे ४३ वे वर्ष असून, गेल्या अनेक वर्षांपासून या मंडळातर्फे तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. त्याप्रमाणे पुढील महिन्यामध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने शिवस्मृती मंडळाची शहरातील श्री निनादेवी मंदिरामध्ये सभा झाली. सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटना, स्थानिक मंडळे, संस्था आणि प्रतिष्ठाने यांना सोबत घेऊन शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे निश्चित केले. सभेला शिवस्मृती मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, विविध हिंदुत्ववादी संघटना आणि शिवभक्त उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

