

जिल्हा रुग्णालयाचा सामान्यांना दिलासा
३३९ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया; ३० मुले हृदय शस्त्रक्रियेसाठी पात्र
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम---लोगो
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत लहान मुलांपासून ते वयोवद्ध नागरिकांना विविध आजारांवरील शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांनाही दिलासा मिळत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात जानेवारी अखेरपर्यंत ० ते १८ वयोगटातील विविध अवघड आजार असलेल्या ३३९ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बालकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण झाला.
एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या दहा महिन्यांच्या कालावधीत आरबीएसकेमार्फत विविध आजारांच्या ३३९ बालकांवर अवघड शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. सर्वाधिक २५ शस्त्रक्रिया हृदयासंदर्भात असून, ३१४ इतर शस्त्रक्रिया आहेत. यामध्ये हाडांच्या, अंडकोषासंदर्भात, हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, जन्मत:च व्यंग, मोतीबिंदू किंवा डोळ्यांमधील दोष, दंत शस्त्रक्रिया, दुभंगलेले ओठ व टाळू अशा अनेक अवघड शस्त्रक्रियांचा समावेश आहे. बालकांवर लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया मोफत होत असल्याने सामान्य कुटुंबाला दिलासा मिळत आहे. दरम्यान, ३० मुले हृदय शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली असून, त्यापैकी २ मुलांच्या पालकांची तयारी नसल्याने शस्त्रक्रिया झाल्या नाहीत तर तिघांवरील शस्त्रक्रिया प्रस्तावित आहेत.
---
आजाराचे वेळीच निदान शक्य
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये १ एप्रिल २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. लहान मुलांमधील जन्मजात विकृती, कमतरतेमुळे होणारे आजार, वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करून उपचार करणे हे या कार्यक्रमाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांच्या आजारांवर मोफत उपचार होतातच; पण आवश्यक असलेल्या शस्त्रक्रियाही मोफत केल्या जातात. काही शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात होतात. काही आजारांचे तज्ज्ञ रत्नागिरीत या शस्त्रक्रियांसाठी येतात. काही शस्त्रक्रियांसाठी या मुलांना मोठ्या शहरांमध्ये पाठवले जाते. अशा वेळी हा सर्व खर्च आरबीएसकेमार्फत केला जातो.
----
विविध आजारांवरील शस्त्रक्रिया
*आजार* पात्र लाभार्थी* झालेल्या शस्त्रक्रिया
*हृदयविकार* ३०* २५
*हाडांच्या* ११* ११
*हर्निया* ३४* ३४
*अपेंडिक्स* ५४* ५४
*दंत* १३* १३
* ईएनटी* ३९* ३९
* दुभंगलेले ओठ* ५* ५
* अन्य* १५३* १५३
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.