पालकमंत्री राणे आज सिंधुदुर्गात
पालकमंत्री राणे
आज सिंधुदुर्गात
सिंधुदुर्गनगरी ः मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नीतेश राणे उद्या (ता. १८) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ, कणकवली आयोजित शिवजयंती उत्सवास उपस्थिती, ११ वाजता राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे या कामाच्या पायाभरणी समारंभास उपस्थिती (ता. मालवण), सायंकाळी ५ वाजता विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल शिवप्रेमी व हिंदू समाज यांच्या माध्यमातून कोलगाव (ता. सावंतवाडी) येथे होणाऱ्या शिवजयंती उत्सवास उपस्थिती, रात्री ८ वाजता जय हनुमान क्रीडा मंडळ, कासार्डे आयोजित डे-नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेस उपस्थिती (कासार्डे उत्तर गावठाण, ता. कणकवली), रात्री ९.३० वाजता सकल मराठा समाज, कणकवली आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवास उपस्थिती.
जिल्ह्यात २५ पर्यंत
मनाई आदेश लागू
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार २५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होत आहे. जिल्ह्यात दहावी व बारावीची शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरळीत पार पाडून कोठेही अनुचित प्रकार घडू नये व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

