

फसवणूकप्रकरणी संशयिताला अटक
अटकपूर्व जामीन फेटाळला ; जमिनविक्री प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ः जमीनविक्रीच्या बहाण्याने सरकारी कर्मचाऱ्याला तब्बल २२ लाख रुपयांची फसवणुकीचा ठपका असलेला व्यावसायिक नीलेश कीर याला शहर पोलिसांनी अटक केली. कीर याने वकिलाला हाताशी धरून फसवणूक केल्याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक टाळण्यासाठी कीर याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे मंगळवारी (ता. १८) शहर पोलिसांनी नीलेश कीर याला अटक केली.
या प्रकरणी जिल्हा परिषद कर्मचारी संदीप मधुकर वेलोंडे यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. वेलोंडे यांच्याशी नीलेश कीरची ओळख होती. वेलोंडे यांचा मित्र सुभाष गराटे यांना १० लाखाची तत्काळ आवश्यकता होती. वेलोंडे यांनी नीलेश कीरला याची माहिती दिली. गराटे यांनी नीलेश कीर याच्याकडे १० लाख रुपये व्याजी मागितले. ही रक्कम गराटे परत करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ओरी येथील २५ एकर जमीन नीलेश कीर याच्या नावावर करून दिली. जमीन नावावर करून दिल्यानंतरही नीलेश कीर आणि गराटे यांच्यात वादावादी झाली. ही वादावादी झाल्यानंतर मध्यस्थी असलेल्या वेलोंडे यांना बोलावून घेण्यात आले. १० लाखाच्या बदल्यात २५ एकर जमीन कीर यांनी आपल्या नावावर करून घेतली; मात्र ही जमीन कीर यांना नको असल्याने मध्यस्थी असलेल्या वेलोंडे यांना आपल्याकडील जमीन विकत घेण्याचा तगादा लावला होता. कंटाळून ती २५ एकर जमीन वेलोंडे यांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या जमिनीचा दर २२ लाख ७२ हजार ठरला. एका वकीलांच्या कार्यालयात नीलेश कीर यांच्या सांगण्यानुसार, १५ एकर जागेचे खरेदीखत तयार केले होते. ठरल्याप्रमाणे २२ लाख ७२ हजार रोख रक्कम नीलेश कीर यांना देण्यात आले. त्यानंतर वकिलांसमोर या खरेदीखतावर सह्या करण्यात आल्या. नीलेश कीर याने हातात रक्कम स्वीकारल्यानंतर ही रक्कम मी घरी ठेवून येतो, असे सांगून त्या ठिकाणाहून पसार झाला. जमीन नावावर न करता फसवणूक केल्याप्रकरणी कीर याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिसांनी संशयित नीलेश कीर याला अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.