‘आशां’ना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा द्या

‘आशां’ना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा द्या
Published on

46132

‘आशां’ना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा द्या

विजया पाटील ः वैभववाडी येथे त्रैवार्षिक अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा,
वैभववाडी, ता. १८ ः आशा स्वयंसेविका या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहेत. त्या थेट जनमानसात पोहचून काम करीत असतात. त्यामुळे शासनाने त्यांना सरकारी सेवेत सहभागी करून घेतले पाहिजे. निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी व ग्रॅच्युईटी अशा सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत, असे मत आशा वर्कर्सच्या जिल्हा सचिव विजया पाटील येथे व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच त्रैवार्षिक अधिवेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात झाले. यावेळी जिल्हा खजिनदार नम्रता वळंजू, वैभववाडी अध्यक्षा सुश्मिता कांबळे, सचिव सेजल जाधव, खजिनदार संजना कोंडविलकर, कार्यकारिणी सदस्य शामल यादव, साक्षी तांबे, प्राची साळुंखे आदी उपस्थित होत्या.
श्रीमती पाटील यांनी आशांना किमान २६ हजार आणि गटप्रवर्तकांना २८ हजार रुपये मासिक वेतन करण्यात यावे, देशात लागू करण्यात आलेल्या कामगार विरोधी संहिता तातडीने रद्द करावा, देशातील महिलांना सन्मान व सुरक्षितता मिळण्यासाठी कठोर कायदे करून त्याची अंमलबजावणी करावी, शिधापत्रिकेसाठी ४५ हजार रुपयांची ठेवलेली उत्पन्नाची कमाल मर्यादा रद्द करण्यात यावी असे ठराव मांडून ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यानंतर नव्याने तीन वर्षांसाठी वैभववाडी तालुका कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.
---
आशांवर ‘आरोग्य’ची महत्वाची जबाबदारी
श्रीमती पाटील म्हणाल्या, ‘‘आशा आणि गटप्रवर्तकांना सामाजिक सुरक्षा योजना, निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी अशा सेवा शासनाकडून मिळाल्या पाहिजेत. तळागाळात जावून आरोग्य सेवा पुरविण्याची महत्वाची जबाबदारी त्या पार पाडत असतात. त्यामुळे आरोग्य कर्मचारी म्हणून त्यांना शासकीय सेवेत घेणे आवश्यक आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com