

46145
मुलांना मोबाईलपासून परावृत्त करा
पौर्णिमा हळदणकर ः बांद्यात ''दैवज्ञ''तर्फे पुण्यस्मरण कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी स्वतः मोबाईल कमी वापरावा व वाचनाची आवड वृद्धिंगत करावी, असे प्रतिपादन निवृत्त शिक्षिका पौर्णिमा हळदणकर यांनी केले.
येथील दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही संत नरहरी सोनार पुण्यतिथी आणि समाजश्रेष्ठ जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ पुण्यस्मरण कार्यक्रम उत्साहात झाला. येथील सहकार कृषी भवनच्या अळवणी सभागृहात झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच संत नरहरी सोनार, नाना शंकरशेठ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पौर्णिमा हळदणकर या होत्या. व्यासपीठावर बांदा दैवज्ञ अध्यक्ष संतोष चिंदरकर, उपाध्यक्ष प्रशांत चिंदरकर, बांदा उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर, मडुरा सरपंच उदय चिंदरकर, बांदा दैवज्ञ समाज महिला अध्यक्ष धनश्री धारगळकर तसेच दैवज्ञ गणपती मंडळ सावंतवाडी कलशारोहण समितीचे सदस्य उपस्थित होते.
बांदा दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या समाजाची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून, अध्यक्षपदी संतोष चिंदरकर, उपाध्यक्षपदी प्रशांत चिंदरकर, खजिनदार राजाराम धारगळकर, सेक्रेटरी साईराज साळगावकर, सदस्य अभी धारगळकर, साईनाथ धारगळकर, बाबुराव धारगळकर, समीर धारगळकर, प्रसाद मालवणकर, दत्तराज चिंदरकर, अवधूत चिंदरकर तसेच सल्लागारपदी अण्णा धारगळकर आणि सुरेश चिंदरकर यांची निवड करण्यात आली. यावेळी समाज भूषण प्रसिद्ध गायक (कै.) प्रभाकर कारेकर, समाजबांधव (कै.) नरेंद्र आकेरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपसरपंच धारगळकर, पायलट प्रथमेश मडगावकर, अभियंता ओंकार शिरोडकर, गुरुप्रसाद धारगळकर, शार्दूल धारगळकर, दैवज्ञ गणपती मंदिर कलशारोहण समिती सदस्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी आयोजित श्लोक पठण स्पर्धेमध्ये मुलांनी उत्तम प्रकारे श्लोक पठण केले. मंगलदास साळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत मालवणकर यांनी आभार मानले. यानिमित्त भजनाचा कार्यक्रम झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.