सलोनीचा सत्कार

सलोनीचा सत्कार
Published on

सलोनी दुदमचा
परचुरीत सत्कार
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथील संदीप दुदम यांची कन्या सलोनी भाईंदर (मुंबई) येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तिची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दुदम गावाला आल्यावर समाजसेवा मंडळातर्फे दीपक लिंगायत यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला तसेच कोंडअसुर्डेचे सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांनी तिला जागर, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन तिचा गौरव केला. हा सत्कार दुदमवाडीच्या वार्षिक समारंभात करण्यात आला. या वेळी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष वसंत दुदम, उपाध्यक्ष दिनेश दुदम, डॉ. विनायक पेठे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, उपसरपंच प्रदीप चंदरकर आदी उपस्थित होते.
---
माखजन मंडळाचा
वर्धापन दिन उत्साहात
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचा वर्धापनदिन नुकताच संस्थेचे अध्यक्ष किशोर साठे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिरूद्ध पोंक्षे उपस्थित होते. या वेळी व्यासपिठावर संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर, सचिव दीपक पोंक्षे, सहसचिव दीपक शिगवण, संचालक आनंद साठे, संजय सहस्रबुद्धे, मुख्याध्यापिका रूही पाटणकर, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले, अलखनंदा पोंक्षे, प्रकाश पोंक्षे आदी उपस्थित होते. या वेळी वार्षिक क्रीडास्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com