राष्ट्रीय कुटुंब
46194
46310
राष्ट्रीय कुटुंब योजनेचा ३८ जणांना लाभ
कणकवलीत लोकाभिमुख कारभार; तहसीलदारांच्या कार्याचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. १९ : लोकाभिमुख प्रशासन राबवण्याच्या दृष्टीने शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवाव्यात या मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेनुसार आणि जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तहसीलदारांनी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची विशेष मोहीम ग्रामस्तरावर राबविली. या योजनेच्या लाभापासून वंचित असलेले ३८ लाभार्थी महसूल यंत्रणेमार्फत शोधण्यात आले. त्यांना ७ लाख ६० हजार एवढा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, शासनाकडून या ३८ लाभार्थ्यांना ७ लाख ६० हजार इतका लाभ देण्यात येणार आहे. या सर्व जणांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना माहीत नसल्याने हे सर्व लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते. तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेतील नायब तहसिलदार गंगाराम कोकरे, अव्वल कारकून दिलीप पाटील, हेमा तोरस्कर, अनिता बागवे, सर्व तलाठी यांनी विशेष मोहीम घेऊन स्वतःहून या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्यामुळे या लाभार्थ्यांना लाभ होणार आहे.
---
अशी आहे शासनाची योजना!
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही राज्य शासनाची काहीशी दुर्लक्षित योजना आहे. यामध्ये घरातील कर्त्या पुरुषाचा अकाली नैसर्गिक मृत्यू झाल्यास शासनातर्फे २० हजार इतके आर्थिक सहाय्य शासनामार्फत देण्यात येत आहे. यासाठी मयत व्यक्ती १८ ते ५९ वयातील असणे आवश्यक आहे. तसेच दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील असायला हवी अशी अट आहे.
--
अशी राबविली मोहीम
दरम्यान, आतापर्यंत ज्यांना ही योजना माहीत आहे, त्यांनी अर्ज केल्यावर या योजनेत लाभ दिला जात होता, परंतु कणकवली तहसील कार्यालयामार्फत फेब्रुवारी २०२५ या महिन्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. यात सर्व तलाठी यांनी ग्रामपंचायत रेकॉर्ड तपासून मागील तीन वर्षात १८ ते ५९ या वयातील मृत झालेल्या व दारिद्र रेषेखाली असलेल्या व्यक्तींची यादी तयार केली. कणकवली तालुक्यात केलेल्या सर्वेनुसार ३८ नवे लाभार्थी शोधण्यात आले. या प्रत्येकाशी संपर्क साधून त्यांच्याकडून कागदपत्रे व अर्ज भरून घेण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

