

शिवजयंतीनिमित्त
किल्ला स्पर्धा
साडवली ः देवरूख येथील मराठा फाउंडेशनतर्फे गणेश खामकर यांच्या पुढाकाराने शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. पोलिस परेड मैदान येथे बालगोपाळांसाठी किल्ला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये २० किल्ल्यांची उभारणी करण्यात आली आहे. या किल्ला प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी दुर्गवीर प्रतिष्ठान किल्ले संवर्धन मोहिमेतील फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्ताने रांगोळी स्पर्धा आणि रस्सीखेच स्पर्धाही घेण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महारांजाचे जीवनचरीत्र रांगोळी कलाकारांनी साकारले आहे.
----------
रोहन पुराणिक यांचे
देवरूख येथे कीर्तन
साडवलीः देवरूख येथील सुप्रसिद्ध गणेश वेदपाठ शाळेत उद्या (ता. २०) गजानन महाराज प्रकट दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनाचे औचित्य साधून श्री गणेश वेदपाठ शाळेत रोहन (बुवा) पुराणिक (कुडाळ) यांचे सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या कीर्तनाच्या कार्यक्रमाला तबलासाथ किशोर भाट्ये तर संवादिनी साथ सुहास पाध्ये (चिखली) करणार आहेत. कीर्तन संपल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळ श्री गणेश वेदपाठशाळा, देवरूख यांनी केले आहे.
--------
शिवजयंतीनिमित्त
माखजन येथे पदयात्रा
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षक प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पदयात्रा काढण्यात आली. या निमित्त मुख्याध्यापिका रूही पाटणकर यांनी शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी व्यासपिठावर पर्यवेक्षक अंबादास घाडगे, ज्येष्ठ शिक्षक संजय सूर्यवंशी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदिप्यमान इतिहासाला उजाळा दिला. प्रा. संजय सूर्यवंशी यांनी शिवछत्रपतींचा इतिहास सगळ्यांसमोर मांडला व कविताही सादर केल्या. शिक्षक अक्षय राजवाडे यांनी पोवाडा सादर केला. शिवजयंतीनिमित्त हस्ताक्षर, चित्रकला, शब्दसंपदा अशा अनेकविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापिका पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला संस्थेचे सहसचिव दीपक शिगवण उपस्थित होते. त्यानंतर ''जय शिवाजी जय भारत'' या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.