

rat19p14.jpg
N46203
रत्नागिरीः श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय कसोप-फणसोपची विद्यार्थिनी प्रेरणा भोजने हिला गौरवताना मान्यवर.
कसोप-फणसोप विद्यामंदिरच्या
तिघांचे मनाचे श्लोक स्पर्धेत यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ः श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या कृपेने श्री समर्थ अभियान पुणे आणि श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्यावतीने आयोजित बालक ते पालक राज्यस्तरीय मनाचे श्लोक अंतिम पठण स्पर्धा कर्वेनगर पुणे येथे झाली. या स्पर्धेत कसोप-फणसोप मुंबई संचलित कै. आरती अरविंद साळवी पूर्व प्राथमिक विद्यामंदिर विद्यार्थी त्रिशा शिंदे व रूद्र गुरव तसेच श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा भोजने यांनी यश मिळविले.
रत्नागिरी जिल्ह्यातून या विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या स्पर्धेत प्रेरणा भोजने हिने द्वितीय क्रमांक पटकावला. शाळेच्या मुख्याध्यापिका नेत्रा राजेशिर्के आणि वर्गशिक्षक मारूती चौगले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या संस्थेचे अध्यक्ष, शाळा समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक राजेशिर्के यांनी तिच्या यशात सहभागी तिचे पालक, पूर्व प्राथमिकचे पालक, समर्थ रामदास अभियानाचे आयोजक यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.