रत्नागिरी ः विभागप्रमुख पदी संतोष हळदणकर

रत्नागिरी ः विभागप्रमुख पदी संतोष हळदणकर
Published on

rat19p18.jpg
46219
रत्नागिरीः उबाठाच्या वाटद जिल्हा परिषद गट विभागप्रमुख पदी निवड झालेले संतोष हळदणकर आणि उपविभाग प्रमुखपदी निवड झालेले सहदेव वीर यांचे अभिनंदन करताना शिवसैनिक.

उबाठाच्या वाटद जिल्हा परिषद गट
विभागप्रमुख पदी संतोष हळदणकर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वाटद जिल्हा परिषद गटाच्या विभागप्रमुख पदी संतोष हळदणकर यांची तर सहदेव वीर यांची वरवडे पंचायत समिती गणाच्या उपविभागप्रमुख पदी निवड केली आहे.
खंडाळा येथील शिवसेना शाखेला रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी भेट दिली. त्या वेळी हळदणकर आणि वीर यांच्या नियुक्तीचे पत्र तालुकाप्रमुखांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव आणि विजय देसाई, शिरगाव विभागप्रमुख मयुरेश्वर पाटील, गावखडी विभागप्रमुख किरण तोडणकर, बारगुडे व भोसले, साई जाधव, आप्पा धनावडे, आप्पा आग्रे व शांताराम वीर यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी नूतन विभागप्रमुख व उपविभागप्रमुख यांना शुभेच्छा देण्यात आल्या. उबाठा शिवसेना स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन या वेळी नव्या पदाधिकाऱ्यांनी दिले तसेच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com