सानिका परुळेकर ठरल्या पाककृती स्पर्धेत विजेत्या

सानिका परुळेकर ठरल्या
पाककृती स्पर्धेत विजेत्या
Published on

46237

सानिका परुळेकर ठरल्या
पाककृती स्पर्धेत विजेत्या

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १९ ः केंद्रशाळा परुळे क्र. ३ येथे केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धेत सानिका परुळेकर यांची ज्वारी आणि मोड आलेल्या मुगाचे वडे ही पाककृती प्रथम आली. तिची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्रधानमंत्री पोषण सक्ती निर्माण योजनेंतर्गत २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने केंद्रशाळा परुळे क्र. ३ येथे तृणधान्ये आधारित केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख नितीन कदम, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सानिका परुळेकर, मुख्याध्यापक प्रवीणा दाभोलकर, आरोग्यसेवक मनोज दुधवडकर, आरोग्य सेविका शलाका वालावलकर, शिक्षक दत्तात्रय म्हैसकर, शालिक पाटील, रवींद्र गोसावी, दर्शना नानचे यासंह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी तृणधान्यापासून विविध पोषक व आरोग्यदायी पाककृतींचे सादरीकरण करण्यात आले. मुलांना जंकफूड देण्यापेक्षा तृणधान्याचा आरोग्य पोषक आहार करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. केंद्रातील शाळांमधील पालकांनी यात सहभाग घेतला. यात नाचणीचे मोदक, तांदळाचे घावणे, इडली, तांदळाचे कटलेस, बाजरीचे आप्पे अशा नवनवीन पाककृती मांडण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com