पिंगुळीत शनिवारपासून लोककला महोत्सव

पिंगुळीत शनिवारपासून लोककला महोत्सव
Published on

46238

पिंगुळीत शनिवारपासून लोककला महोत्सव

गणपत मसगे ः ठाकर समाजाच्या पारंपरिक कलांची मेजवानी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः ‘‘महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान पिंगुळी येथे ठाकरवाडी म्युझियमच्या पटांगणावर सायंकाळी ६ ते १०.३० या वेळेत ‘पिंगुळी लोककला महोत्सव-२०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त तिन्ही विविध पारंपरिक ठाकर लोककलांचा कार्यक्रम होणार आहे,’’ अशी माहिती राष्ट्रीय लोककलाकार व कलागुरू गणपत मसगे यांनी दिली.
शासनामार्फत जिल्ह्यात प्रथमच हा लोककला महोत्सव होत असून यानिमित्ताने ठाकर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी म्हणून राधानृत्य, कळसुत्री बाहुल्या, चित्रकथी, पांगुळ बैल, पोवाडा, पोतराज, तारवागीत, डोनागीत असे विविध कलाप्रकार होणार आहेत. या लोककला महोत्सवाचे उद्‍घाटन शनिवारी (२२) सकाळी ११.३० वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे राज्य सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
‘‘कार्यक्रमास खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे, दीपक केसरकर, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे आदी उपस्थित राहणार आहेत,’’ अशी माहिती राष्ट्रीय लोककलाकार व कलागुरू गणपत मसगे, पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष भगवान रणसिंग, ठाकर लोककला संवर्धन व पर्यटन संस्थाध्यक्ष भास्कर गंगावणे, पिंगुळी उपसरपंच सागर रणसिंग यांनी दिली.
---
पहिल्या दिवशी ‘राम जन्मोत्सव’
उत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘राम जन्मोत्सव’ हा कळसुत्री बाहुल्यांचा नावीन्यपूर्ण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा पहिला शो इंटरनॅशनल पपेट फेस्टिवल, बंगळूर येथे झाला होता. त्यानंतर तो प्रथमतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे. दुसऱ्या दिवशी ठाकर लोककलांतील वेगळी ओळख दाखविणारा पोवाडा, कणकवली येथील प्रसिद्ध राधानृत्य, सुकळवाड येथील ठाकर कलाकारांचा पारंपरिक गोंधळ व सांकेतिक भाषा हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सर्वांना पाहता येईल. यानंतर पिंगुळी येथील राधा नृत्य, फुगडी, पिंगळा असे कार्यक्रम होणार आहेत.
--
‘दुसऱ्या दिवशीही विविध कार्यक्रम’
‘‘महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी लोप पावत असलेला दुर्मीळ असा कलाप्रकार तारवा गीत, दोडामार्ग येथील पारंपरिक राधानृत्य, मालवण कट्टा येथील गोंधळ व संबळ तुणतुणं वादन, आगीसोबत खेळ करणारा पोतराज, प्राचीन अशा चामड्याच्या बाहुल्या यांचा सहभाग या महोत्सवात असणार आहे. हा महोत्सव नागरिकांसाठी मोफत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन कलागुरू गणपत मसगे, भगवान रणसिंग, भास्कर गंगावणे, सागर रणसिंग यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com