छत्रपती शिवरायांचा सावंतवाडीत जयघोष
46243
46241
46242
छत्रपती शिवरायांचा सावंतवाडीत जयघोष
रॅली, वेशभूषा लक्षवेधी; राष्ट्रवादी शरद पवार गट, ‘भोसले नॉलेज सिटी’मध्ये शिवजयंती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता.१९ ः येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, स्वराज्य संघटना सावंतवाडी तसेच भोसले नॉलेज सिटीमध्ये शिवरायांना अभिवादन करण्यात आले. भगवे फेटे, भगवे झेंडे यामुळे शहर भगवामय झाले होते.
शरद पवार राष्ट्रवादीतर्फे शिवजयंती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्यावतीने येथील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त छत्रपतींचा जयघोष करण्यात आला. यावेळी सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष उदय भोसले, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, दिव्यांग सेलचे प्रमुख साबाजी सावंत, सावंतवाडी राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, प्रांतिक सदस्य सत्यजित धारणकर, गुरुनाथ कामत, डॉ. तुषार भोसले, सतीश नाईक, जानकी नाईक, जानवी परब, श्री. गुंजाळ, रोहन परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.
...............
शिवस्वराज्य रॅलीस सावंतवाडीत प्रतिसाद
स्वराज्य संघटना सावंतवाडीमार्फत आयोजित शिवस्वराज्य रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजवाडा येथून युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रॅलीस प्रारंभ करण्यात आला. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वराज्य संघटनेतर्फे शिवस्वराज्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, अमोल साटेलकर, अॅड. राजू कासकर, सोमनाथ गावडे, महेंद्र सांगेलकर, पुंडलिक दळवी, नयनेश गावडे, संदीप धुरी, देव्या सूर्याजी, संतोष तळवणेकर, महेश पांचाळ, विजय कदम, दिनेश गावडे, अभिजित सावंत, अतुल केसरकर, श्रीपाद सावंत, किशोर चिटणीस, अजित सांगेलकर, बंटी जामदार, अजय गोंदावळे, साक्षी वंजारी, मोहिनी मडगावकर, पुजा दळवी, कृतिका कोरगावकर, बाळू पार्सेकर, केतन सावंत, पांडुरंग काकतकर आदींसह मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी या रॅलीत सहभाग घेतला.
---
भोसले नॉलेज सिटी
सावंतवाडी ः भोसले नॉलेज सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज साजरी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आलेल्या शिवज्योतीचे स्वागत संस्थेच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले. त्यानंतर कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले व सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत-भोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीम नृत्य करत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी पोवाडे व भाषण करत महाराजांना मानवंदना दिली. वाय.बी.आय.एस. प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्यांनी आकर्षक वेशभूषा साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी गोंधळी नृत्यही सादर करण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या नामघोषाने संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

