सावंतवाडी पत्रकार संघातर्फे २७ ला वक्तृत्व स्पर्धा

सावंतवाडी पत्रकार संघातर्फे २७ ला वक्तृत्व स्पर्धा

Published on

सावंतवाडी पत्रकार संघातर्फे
२७ ला वक्तृत्व स्पर्धा

इन्सुली विद्यालयामध्ये आयोजन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः येथील तालुका पत्रकार संघ आणि विद्या विकास मंडळ, इन्सुलीच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पत्रकार तथा नाट्यकर्मी (कै.) प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली म्हणून २७ ला तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. याबाबतचा निर्णय नुकताच पत्रकार संघाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. ही स्पर्धा इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता या स्पर्धेचे उद्‍घाटन होणार असून स्पर्धेनंतर तात्काळ पारितोषिक वितरण केले जाणार आहे.
तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सहसचिव विनायक गांवस, उपाध्यक्ष हेमंत मराठे, सदस्य तथा स्पर्धा नियोजन प्रमुख गुरुनाथ पेडणेकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, सचिन रेडकर, हर्षवर्धन धारणकर, दिव्या वायंगणकर, नागेश पाटील आदी उपस्थित होते. ही स्पर्धेत दोन गट सहभागी होणार असून पहिल्या गटामध्ये पाचवी ते आठवी या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. यामध्ये ‘पुस्तक माझा खरा मित्र’ आणि ‘मोबाईलमुळे बालपण हरवत आहे का?’ हे दोन विषय असतील. यासाठी चार मिनिटे वेळ देण्यात आला आहे. या गटामध्ये प्रथम क्रमांकाला ११११ रुपये रोख प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह पारितोषिक दिले जाणार आहे तर उपविजेत्याला ७७७ रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला ५५५ रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
दुसऱ्या गटामध्ये नववी ते बारावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या गटासाठी ‘मराठी राजभाषे समोरील आव्हाने’ आणि ‘मराठी भाषा विकासात माझी भूमिका’ हे विषय आहेत. या गटामध्ये स्पर्धकाला सहा मिनिटांची वेळ देण्यात आली आहे. या गटातील विजेत्याला रोख १५०१, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी एक हजार एक रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, आणि तृतीय क्रमांक ७७७ रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी आपली नावे स्पर्धा नियोजन प्रमुख गुरुनाथ पेडणेकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आणि सौ. विशाखा पालव यांच्याकडे सोमवारपर्यत (ता.२४) सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदविणे बंधनकारक आहे. या स्पर्धेमध्ये गट कमांक १ मध्ये एका प्रशालेतील एकाच स्पर्धकाला सहभागी होता येईल. स्पर्धकाने आपल्या गटासाठी दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर भाषण करावे. आपले भाषण स्वहस्ताक्षरात लिहून आणावे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com