वरवडे ते कणकवली वाहनफेरी थाटात
46271
वरवडे ते कणकवली वाहनफेरी थाटात
शिवजयंतीचा उत्साह ः मोठ्या संख्येने शिवभक्तांचा सहभाग
कणकवली, ता.१९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवलीच्यावतीने वरवडे ते कणकवली अशी वाहनफेरी काढण्यात आली. मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव, शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष तथा मराठा समाजाचे युवानेते प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या वाहनफेरीत शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वाहनफेरीचा प्रारंभ वरवडे येथील पुलानजीक प्रताप भोसले यांच्या उपस्थितीत, शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे उपाध्यक्ष कान्हा मालंडकर यांच्या हस्ते झाला. यावेळी वरवडे सरपंच करूणा घाडीगांवकर, बिडवाडी सरपंच पूजा चव्हाण, उपसरपंच सुदाम तेली, पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे, कलमठ माजी सरपंच निसार शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय साळसकर आदी उपस्थित होते.
या फेरीमध्ये दुचाकीवरील मावळा बालशिवाजी, खास सजविलेल्या, किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या वाहनामध्ये असलेले बालशिवाजी व बाल मावळे लक्षवेधून घेत होते. फेरीदरम्यान शिवप्रेमींनी शिवरायांचा जोरदार जयघोष केला. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या फेरीचा समारोप झाला. या फेरीमध्ये शिवजयंती उत्सव समितीचे सचिव दिनेश सावंत, संतोष उर्फ पप्पू पुजारे, प्रवीण उर्फ बाळा सावंत, सुभाष मालंडकर, आनंद घाडीगांवकर, अमित पवार, रुपेश नाडकर्णी, इब्राहिम शेख अली, राजू कुडाळकर, राज सावंत, मनोज घाडीगांवकर, बंड्या मालंडकर, भाई सावंत, सोहेल खान, सलमान शेख, राजू कुडाळकर, अभिजीत चव्हाण, अमोल घाडीगांवकर, समीर कदम, सचिन राणे, प्रसाद गावकर, राजू बावकर, ओंकार कदम आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

