संक्षिप्त

संक्षिप्त

Published on

आंबडस-चिरणी फाटा
येथे क्रिकेट स्पर्धा
चिपळूण : खेड तालुका बौद्ध समाजसेवाअंतर्गत सातगाव बौद्ध समाजसेवा संघ स्थानिक आणि मुंबई यांच्यावतीने भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान आंबडस-चिरणीफाटा येथील मैदानात आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या, तृतीय व चतुर्थ संघास रोख बक्षीस, आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला २५ हजार रुपये, उपविजेत्या संघास १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक संघास ६ हजार रुपये व चतुर्थ क्रमांक संघास ४ हजार रुपये रोख व प्रत्येकी संघास आकर्षक चषक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात येणार आहे. याचबरोबर वैयक्तीक पारितोषिकेदेखील ठेवण्यात आली आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक खेळाडूस आकर्षक चषक आणि टीशर्ट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com