राजापूर-राजापूर आगारासमोरील महामार्गावर काळोख

राजापूर-राजापूर आगारासमोरील महामार्गावर काळोख

Published on

राजापूर आगारासमोरील महामार्गावर काळोख
वीज व्यवस्था बंद ; वाहनचालकांसह पादचाऱ्यांचीही गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे राजापूर शहरातील एसटी डेपोसमोरील काम रखडले आहे. अन्य काम पूर्ण झाले असले तरी शहरातील डेपोसमोरील उड्डाणपुलासह महामार्गावरील अन्य भागांमध्ये सुरू करण्यात आलेल्या लाईटचा गेल्या काही दिवसांपासून ‘स्विच ऑफ’ झाला आहे. त्यामुळे नागमोड्या वळणाच्या महागामार्गावरून वाहनचालकांना काळोखातून प्रवास करावा लागत आहे.
शहरातील एसटी डेपो आणि तीन-चार ठिकाणचा तिढा सुटला नसल्याने येथील कामे रखडलेली आहेत. तालुक्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे महामार्गावरून वाहनांचा सुरळीत प्रवास सुरू झाला आहे. या वाहनचालकांना गेल्या काही दिवसांपासून नव्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
चौपदरीकरण झाले असले तरी महामार्ग नागमोडी वळण आणि अनेक ठिकाणी उताराचा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांचा अपघात होण्याचा संभव असतो. त्यामुळे महामार्गावर वीजव्यवस्था करण्यात आली आहे. या वीजव्यवस्थेमध्ये रात्रीच्यावेळी रस्त्यावर असलेल्या प्रकाशामुळे वाहनचालकांना वाहनांची वर्दळ लगेच लक्षात येते; मात्र शहरातील उड्डाणपूल परिसरातील वीजव्यवस्था गेल्या काही दिवसांपासून बंद स्थितीमध्ये आहे. एसटी डेपोसमोरील उड्डाणपूल परिसरामध्ये वळण आणि उताराचा रस्ता आहे. या परिसरातील वीजव्यवस्था बंद असल्याने या भागामध्ये अपघात होण्याचा अनेकवेळा संभव असतो. त्यामुळे स्वीच ऑफ असलेली वीजव्यवस्था तत्काळ कार्यान्वित करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

चौकट
अधारात चोरट्यांचे फावते
शहरातील उड्डाणपुलाच्या येथील बंद स्थितीत असलेल्या विजेचा या परिसरातील नागरिकांना फटका बसतो. या परिसरामध्ये असलेल्या काळोखाचा फायदा घेत काही चोरट्यांनी या परिसरामध्ये हात साफ करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची अनेक नागरिकांची तक्रार आहे. चोरट्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी उड्डाणपूल परिसरातील काहींनी आपल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेराही बसवला आहे.

कोट
एसटी डेपोसमोरील उड्डाणपुलाच्या येथील महामागार्वरील बंद स्थितीमध्ये असलेले पथदीप सुरू करण्यासाठी सामाजिक कायर्कर्ते अरविंद लांजेकर यांच्या प्रयत्नातून सात-आठ महिन्यांपूर्वी सुरू झाले होते; मात्र त्यानंतर पुन्हा गेल्या दहा-बारा दिवसांपासून हे पथदीप बंद आहेत.
- अनंत आडविलकर, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com