

रत्नागिरीत शिवजयंतीचा जल्लोष..!
इंट्रो
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी शहरात लेझीम, ढोलाच्या निनादात जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये छत्रपतींच्या वेशभूषेतील विद्यार्थी, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये शासकीय कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या फेरीमुळे रत्नागिरी शहरातील वातावरण शिवमय झाले होते. रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक, तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. मारूती मंदिर सर्कलमध्ये तरुणाई फोटो काढून सोशल मीडियावर टाकत आनंदोत्सव साजरा करताना दिसत होती...!
rat19p2.jpg
46204
रत्नागिरीः जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या पदयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिह.
rat19p4.jpg
46206
रत्नागिरी ः छत्रपती शिवाजी महाराजांचा पोषाख परिधान केलेला तरुण. सोबत असलेले मावळे.
rat19p5.jpg-
46207
पदयात्रेवेळी तरुणांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी.
rat19p7.jpg
46209
पारंपरिक वेशभूषेतील तरुणाई.
rat19p8.jpg-
46210
रत्नदुर्ग किल्ल्याजवळील नव्याने होत असलेल्या शिवसृष्टी येथे शिवजयंतीनिमित्त एकवटलेले रत्नागिरीकर.
rat19p24.jpg-
46250
राजापूर ः छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील मुले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.