आमदार नीलेश राणे, केसरकर शिवराजेश्वर मंदिरात नतमस्तक
46322
आमदार नीलेश राणे, केसरकर
शिवराजेश्वर मंदिरात नतमस्तक
मालवण, ता. १९ ः छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यानिमित्त आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झाले. महाराजांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
दरवर्षी शिवजयंती सोहळा निमित्ताने आमदार नीलेश राणे किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी जात नतमस्तक होतात. त्यानुसार आज त्यांनी दर्शन घेतले. महाराज हे आम्हा सर्वांचे दैवत आहे. या दैवताची पुजा केली आशीर्वाद घेतले असे आमदार राणे यांनी सांगितले. शिवजयंती दिनी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली असे ट्वीट केले आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता आमदार राणे म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांना देशाची संस्कृतीच माहित नाही. गांधी आणि ठाकरे या दोघांमध्ये घमेंड अधिक आहे. राहुल गांधी यांनी माफी मागितलीच पाहिजे.’’ यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, संजू परब, शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, दादा साईल, राकेश सावंत, राजेश सावंत, राजू बिडये, निषय पालेकर, सनी कुडाळकर, शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख निलम शिंदे, दीपलक्ष्मी पडते, माधुरी तुळसकर, आशा वळपी, सिद्धी शिरसाठ, सोनाली पाटकर, अंजना सामंत, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, ऋषिकेश सामंत, विराज गुडेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

