राष्ट्रसंत रोहिदास यांना कळसुलीत अभिवादन

राष्ट्रसंत रोहिदास यांना कळसुलीत अभिवादन
Published on

46343

राष्ट्रसंत रोहिदास यांना
कळसुलीत अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १९ ः कळसुली चव्हाणवाडी येथे श्री संत रोहिदास महाराज उन्नती मंडळाच्यावतीने राष्ट्रसंत रोहिदास महाराज यांची ६४८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाडीतील सर्व ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. महिलांनी हळदीकुंकू आणि फनी गेम्समध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यामध्ये वृषाली चव्हाण व श्वेता चव्हाण या दोघी विजयी ठरल्या. सूरज परब (तळवडे) पुरस्कृत मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या नाटकाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांमध्ये नीलम जाधव, नामदेव जाधव, महानंद चव्हाण, महेंद्र चव्हाण, कृष्णा चव्हाण, राजेंद्र चव्हाण, आनंद जाधव, अनिल चव्हाण, उपसरपंच गजानन मटकर आदींची उपस्थिती होती. मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, उपाध्यक्ष अजित चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रस्तावना व आभार प्रदर्शन लक्ष्मण चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी संत रोहिदास उन्नती मंडळाचे सर्व संचालक, सल्लागार व संत रोहिदास महाराज स्वयंसहायता महिला मंडळाचे योगदान लाभले.
................
46344

कळसुलकर हायस्कूलमध्ये
‘गरुडझेप’ नाटक लक्षवेधी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः येथील एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेत शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या मूर्तीला आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवचरित्र व कार्यावर आधारित विद्यार्थ्यांनी भाषणे, शिवगर्जना पोवाडा, वेशभूषा, कविता, नृत्य, नाटिका सादर केली.
चिन्मय कोटणीस याने लेखन व दिग्दर्शन केलेले ‘आगऱ्याहून सुटका’ अर्थात ‘गरुडझेप’ नाटक लक्षवेधी ठरले. प्रशालेच्या सभागृहात भव्य रांगोळी साकारण्यात आली. मावळ्यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य प्रस्थापित केले आणि एक इतिहास घडला, या संकल्पनेतून कलाशिक्षक केदार टेमकर यांच्यासह विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज व मावळ्यांची भव्य व्यक्तिचित्र रांगोळी साकारली. या रांगोळीसाठी तब्बल १६ तासांचा कालावधी लागला. या सभागृहातील रांगोळीचे प्रदर्शन २८ फेब्रुवारीपर्यंत खुले राहणार आहे. या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य सूर्यकांत भुरे, सांस्कृतिक विभागातील अनिल ठाकूर, संस्था पदाधिकारी वर्ग, माजी विद्यार्थी व हितचिंतक यांनी शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रसाद कोलगावकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com