

rat19p44.jpg
46358
साखरपाः प्रतिमापूजन आणि शिवज्योत प्रज्वलित करताना मान्यवर.
------------
कबनूरकर स्कूलमध्ये
लाठीकाठी प्रात्यक्षिक
साखरपा, ता. १९ः कोंडगाव येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त शिवजन्म, शिवपाळणा, स्वराज्य शपथ, राज्याभिषेक आदी दृश्ये साकारण्यात आली.
प्रारंभी मुख्याध्यापिका लिना कबनूरकर, केंद्रीय प्रमुख दिव्या भाटकर, माजी सरपंच धनश्री जोशी, संस्था चेअरमन श्रीधर कबनूरकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. शर्वरी सुतार यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. शिवचरित्रातील काही प्रसंग विद्यार्थ्यांनी सादर केले. यात शिवजन्म, शिवपाळणा नृत्य, शिवगर्जना, पोवाडा शिवप्रतिज्ञा, दीपनृत्य, लाठीकाठी आणि राज्याभिषेक आदी प्रसंग दाखवण्यात आले. सूत्रसंचालन स्वाती चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन गायत्री सावकार यांनी केले. माजी सरपंच धनश्री जोशी यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत शाळेला शिवप्रतिमा भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.