राजापूर ः स्वमालकीच्या जागेत स्थलांतर
राजापूर अर्बनच्या लांजा शाखेचे
स्वमालकीच्या जागेत स्थलांतर
राजापूर, ता. १९ः शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या येथील राजापूर अर्बन को. ऑप. बॅंकेच्या लांजा शाखेचा स्वमालकीच्या जागेत स्थलांतर आणि एटीएम कक्षाचे उद्घाटन शनिवारी (ता. २२) सकाळी १० वाजता लांजा येथे आयोजित केला आहे.
बँकेच्या अध्यक्षा अनामिका जाधव यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. राजापूर बॅंकेची लांजा शाखा २४ ऑक्टोबर १९९९ पासून ग्राहकांच्या सेवेत आहे. आता बँकेने स्वतःची जागा घेतली असून बँकेच्या लांजा शाखेचा स्वमालकीच्या जागेत स्थलांतर केले आहे. शनिवारी सकाळी १० वाजता याचे उद्घाटन असून, लांजा बाजारपेठेतील मारीगोल्ड बिल्डिंगमध्ये याची शाखा सुरू होणार आहे.
या वेळी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, लांजा तालुका व्यापारी संघ अध्यक्ष प्रसन्न शेटये, एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अनिल ठाकूरदेसाई आदी उपस्थित रहाणार आहेत. या सोहळ्यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे. शाखा स्थलांतर सोहळा आणि एटीएम कक्ष उद्घाटनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष व पालक संचालक विवेक गादीकर, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

